Google चा मोठा अपडेट! 15 कोटी Youtube, Gmail अकॉउंटची आजपासून वाढणार सुरक्षा
By सिद्धेश जाधव | Published: November 9, 2021 05:44 PM2021-11-09T17:44:44+5:302021-11-09T17:44:52+5:30
Google Security Update 2SV: Google आज 150 मिलियन पेक्षा जास्त युजर्ससाठी बंधनकरार 2SV (टू-स्टेप-व्हेरिफिकेशन) फीचर रोल आउट करत आहे.
Google ने आज मोठा सिक्योरिटी अपडेट रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे 15 कोटींपेक्षा जास्त युजर्सना आपल्या गुगल अकॉउंटवर 2SV (टू-स्टेप-व्हेरिफिकेशन) ऑन करणे बंधनकारक असेल. जे अकॉउंट योग्यरित्या कॉन्फीगर करण्यात आले आहेत त्या अकॉउंटना 2SV फीचरने अपडेट करण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने मे मधेच केली होती. तसेच 2021 च्या अखरेसी 150 मिलियन Google अकॉउंट 2SV वर ऑटो एनरॉल होतील, असे देखील कंपनीने ब्लॉग पोस्टमधून सांगितले होते.
2SV फीचर इनेबल झाल्यानंतर Google युजरचे Gmail अकॉउंट आधीच्या तुलनेत जास्त सुरक्षित होईल, असे टेक दिग्गजने सांगितले आहे. 9 नोव्हेंबर म्हणजे आजपासून ज्या युजर्सचे अकॉउंट्स 2SV म्हणजे टू-स्टेप-व्हेरिफिकेशन फीचरने अपग्रेड होतील, त्यांना ई-मेल द्वारे त्यांची माहिती देण्यात येईल. चला जाणून घेऊया 2SV म्हणजे काय आणि त्यांचे युजरवर होणारे परिणाम.
2SV म्हणजे काय?
Google प्रत्येक युजरचे अकॉउंट 2SV (टू-स्टेप-व्हेरिफिकेशन) वर अपग्रेड करणार आहे. सध्या कंपनीने पहिल्या टप्प्यात 150 मिलियन अकॉउंट 2SV वर ऑटो एनरॉल करणार आहे. कंपनीनुसार, ज्या युजर्सचे अकॉउंट योग्यरीत्या कॉन्फीगर (Appropriately configured) करण्यात आले आहेत, त्यांचे अकॉउंट सुरक्षित करण्यासाठी 2SV वर ऑटो-एनरॉल केले जातील.
अकॉउंट क्रिएट करताना मोबाईल नंबर आणि सेकंडरी ई-मेल देणारे अकॉउंट म्हणजे “Appropriately configured” अकॉउंट्स होय. अशा Gmail अकॉउंटसह मोबाईल नंबर आणि सेकंडरी ई-मेल अड्रेस लिंक असलेल्या युजर्सना अकॉउंटमध्ये लॉग-इन करताना त्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल.
Two-Step Verification कसे एनेबल करायचे
- तुमचे Google Account ओपन करा
- डावीकडे असलेल्या नेव्हिगेशन पॅनलमध्ये ‘security’ ची निवड करा
- त्यानंतर Signing in to Google ऑप्शनच्या खाली असलेलं 2-Step Verification ऑन करा
- आता समोर येणाऱ्या स्टेप्स फोल्लो करा.