गुगलसोबत आता मराठीतून बोला

By sagar.sirsat | Published: August 14, 2017 07:24 PM2017-08-14T19:24:13+5:302017-08-15T19:28:26+5:30

अग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे.  यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

Google voice search feature for 8 more Indian languages | गुगलसोबत आता मराठीतून बोला

गुगलसोबत आता मराठीतून बोला

Next
ठळक मुद्देअग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे.आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे यामध्ये आपली मायबोली मराठीचाही समावेश आहे.यापूर्वी गुगल केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा देत होतं. 

नवी दिल्ली, दि. 14 - अग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सेवा सुरू केली आहे.  यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये आपली मायबोली मराठीचाही समावेश आहे. यापूर्वी गुगल केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा देत होतं. 
'' आता जगभरात गुगल व्हॉइस सर्च 119 भाषांना सपोर्ट करतं, भारतीयांना चांगली सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्नशील आहे. भारतातून वेगवेगळ्या भाषिकांनी गुगल वापरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. आवाजाचे वेगवेगळे नमुने मिळवण्यासाठी भारतीय भाषा बोलणा-यांसोबत गुगल काम करत आहे,  2021 पर्यंत गुगलवर भारतीय भाषांचा वापर करणा-यांची संख्या जवळपास 53.6 कोटी होण्याची शक्यता आहे'' असं गुगलचे टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर दान व्हॅन एस्क म्हणाले.  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुगलचे टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर दान व्हॅन एस्क यांनी याबाबत माहिती दिली.  
कसं वापरायचं व्हॉइस सर्च- 
-व्हॉइस सर्चसाठी सर्वात आधी पहिले गुगल प्ले स्टोअरवरून जीबोर्ड अॅप इन्स्टॉल करा
-त्यानंतर  व्हॉइस सेटिंगमधून तुमच्या आवडीच्या भाषेचा पर्याय निवडा
-यानंतर तुम्हाला जी माहिती हवी असेल ते बोलून सर्च करता येईल. 
 

Web Title: Google voice search feature for 8 more Indian languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.