Google Gmail अकाऊंट करणार बंद! तुमच्या खात्याचा समावेश आहे का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 02:54 PM2023-05-17T14:54:59+5:302023-05-17T15:08:22+5:30
तुमचे Gmail किंवा Google Photos खाते असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Google द्वारे लाखो Gmail आणि Google Photos खाती बंद केली जातील.
तुमचे Gmail किंवा Google Photos खाते असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Google द्वारे लाखो Gmail आणि Google Photos खाती बंद केली जातील. Google ने घोषणा केली आहे की डिसेंबर 2023 च्या सुरुवातीपासून, Gmail आणि Google Photos खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. चला जाणून घेऊ कोणती खाती बंद करण्यात येणार आहेत.
जे खाते एक-दोन वर्षांपासून वापरले नाही ते अनावश्यक आहेत. अशी सर्व खाती बंद करावीत. Google ला विश्वास आहे की यामुळे जोखीम कमी करण्यात आणि सुरक्षा उपाय मजबूत करण्यात मदत होईल.
व्हॉट्सॲपचे चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक, तोच वाचू शकेल
Google द्वारे वैयक्तिक Gmail आणि Google Photos खाते बंद केले जाईल. हा नियम शाळा आणि व्यावसायिक खात्यांना लागू होणार नाही.
गुगलच्या मते, निष्क्रिय खाती एकाच वेळी बंद होणार नाहीत. ही एक टप्प्याटप्प्याने प्रक्रिया असेल. अगोदर, ती खाती बंद केली जातील, जी सुरू केल्यापासून कधीही वापरली गेली नाहीत. त्याच वेळी, कोणतेही खाते बंद करण्यापूर्वी, कंपनी काही महिने अगोदर त्या खात्यावर मेल पाठवत असते.