Google चा युजर्सना धोका? पॉर्न बघणाऱ्यांचा डेटा गोळा केला जातोय? प्रायव्हेट ब्राउजिंगच ‘प्रायव्हेट’ नाही
By सिद्धेश जाधव | Published: May 20, 2022 05:40 PM2022-05-20T17:40:52+5:302022-05-20T17:42:42+5:30
टेक्सस कोर्टात गुगल विरोधात प्रायव्हेट मोडमध्ये युजर डेटा ट्रॅक करण्यासाठी खटला दाखल करण्यात आला आहे.
Google वर अनेकदा डेटा गोळा करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा असाच एक आरोप करण्यात आला आहे. यावेळी टेक जायंट Incognito Mode अर्थात प्रायव्हेट ब्राउजिंग मोडमध्ये देखील युजर्सचा डेटा गोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इकोग्निटो मोडचा वापर आपली हिस्ट्री ब्राऊजरमध्ये राहू नये म्हणून केला जातो.
टेक्ससचे अॅटर्नी जनरल Ken Pexton यांनी 19 मेला गुगलच्या पॅरेंट कंपनी Alphabet Inc विरोधात खटला दाखल केला आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या केसनुसार, गुगल प्रायव्हेट मोडमध्ये ब्राउजिंग केल्यावर देखील युजरचा खाजगी डेटा कलेक्ट करतं.
प्रायव्हेट ब्राउजिंग देखील नाही सुरक्षित
केन पेक्सटन यांनी Google विरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कोणत्याही ब्राउजरचा इनकॉगनिटो मोड किंवा प्रायव्हेट ब्राउजिंग मोड सेफ ब्राउजिंगसाठी देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की कंपनीनं या मोडमधील युजरची सर्च हिस्ट्री आणि लोकेशन अॅक्टिव्हिटी ट्रॅक न करणं अपेक्षित असतं.
या खटल्यानुसार, गुगल प्रायव्हेट ब्राउजिंगचा पर्याय देतं, जो खाजगी वेबसाईट बघण्यासाठी असतो ज्यात मेडिकल हिस्ट्री, पॉलिटिकल परसुएशन आणि सेक्सुअल ओरिएंटेशन इत्यादी माहिती शोधण्यासाठी या मोडचा वापर केला जातो. तसेच या मोडचा वापर ऑनलाईन जाहिरातदारांपासून दूर राहण्यासाठी देखील केला जातो.
गुगलची प्रतिक्रिया
Google ने केन पेक्स्टन यांचा दावा खोटा असल्याचं सांगत म्हटलं आहे की यात चुकीच्या तथ्यांचा आधार घेण्यात आला आहे. आम्ही नेहमीच युजर्सची प्रायव्हसीची काळजी घेतो आणि आपल्या प्रोडक्ट्समध्ये प्रायव्हसी फीचर जोडतो जे लोकेशन डेटासाठी कंट्रोल देते. गुगलनं आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत आणि या खटल्यात आपली बाजू मांडणार असल्याचं म्हटलं आहे.