#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:07 AM2018-12-24T10:07:38+5:302018-12-24T10:14:54+5:30
राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे
नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने वर्षभर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण प्रत्येकवेळी गुगलवर ती पटकन सर्च करतो. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे
भारतीय युजर्सनी 2018 मध्ये गुगलवर 'हे' 10 विषय केले सर्वाधिक सर्च
- FIFA World Cup 2018
- Live Score
- IPL 2018
- Karnataka elections results
- Baal Veer
- Bigg Boss
- Robot 2.0
- Asia Cup 2018
- Motu Patlu
- Asian Games 2018
गुगलने प्रसिद्ध केलेल्या या लिस्टमध्ये ‘How to’ पण सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. यामध्ये WhatsApp Stickers, Aadhaar, Mobile number porting या गोष्टींची माहिती सर्वात जास्त सर्च केली गेली आहे.
- How to Send Stickers on WhatsApp
- How to link Aadhaar with mobile number
- How to make rangoli
- How to port mobile number
- How to invest in Bitcoin
- Ayushman Bharat Yojana how to Apply
- How to remove holi color from face
- How to check 10th result 2018
- How to Solve Rubik’s cube
- How to check name in NRC Assam
एखादा नवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण गुगलवर त्याबाबतची माहिती सर्च करतात. यंदा ‘Movies’ सर्च लिस्टमध्ये Robot 2.0 पहिल्या क्रमांकावर आहे. ‘What is’ या कॅटेगरीमध्ये ‘What is section 377’ आणि ‘Near me’ कॅटगरीमध्ये ‘Mobile Store near me’ सर्चमध्ये टॉपवर आहे.