गुगलचे शैक्षणिक एक्सपेडिशन अ‍ॅप

By शेखर पाटील | Published: June 1, 2018 12:33 PM2018-06-01T12:33:19+5:302018-06-01T12:33:19+5:30

गुगलने आपल्या एक्सपेडिशन अ‍ॅपमध्ये आता ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीची सुविधा देत याला नव्याने सादर करण्याची घोषणा केली आहे.

 Google's Education Expedition App | गुगलचे शैक्षणिक एक्सपेडिशन अ‍ॅप

गुगलचे शैक्षणिक एक्सपेडिशन अ‍ॅप

googlenewsNext

गुगलने गेल्या वर्षी एक्सपेडिशन अ‍ॅप सादर केले होते. याला पहिल्यांदा आयओएस आणि नंतर अँड्रॉइडसाठी सादर करण्यात आले होते. यात प्रारंभी आभासी सत्यता म्हणजेच व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर करण्यात आला होता. यासाठी गुगलने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने विविध शैक्षणिक टुर्स निर्माण केल्या होत्या. याचा वापर करून कुणीही विद्यार्थी त्या-त्या विषयाशी संबंधीत सखोल माहितीचा अनुभव घेण्यास सक्षम होता. यासाठी विद्यार्थ्याला व्हिआर हेडसेटची आवश्यकता होता. तथापि, अलीकडेच या अ‍ॅपला अपडेट करण्यात आले असून यामध्ये विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकारांमधील शिक्षणासाठी या अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. याचे अतिशय भन्नाट उपयोग आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्वालामुखीबाबत माहिती द्यावयाची असल्यास  स्मार्टफोनला सेल्फी स्टीकच्या मदतीने धरल्यास त्यांना त्यांच्या वर्गातच ज्वालामुखीचा उद्रेक दिसेल. याच प्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधीत विविध घटक आपल्या वर्गातच पाहता नव्हे तर अनुभवता येतील. दरम्यान, अनेक डेव्हलपर्सनी आधीच या तंत्रज्ञानावर आधारित अनेक अ‍ॅप्स तयार केले आहेत. यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अगदी इमर्सीव्ह पध्दतीने ज्ञानार्जन करता येणार आहे.

एक्सपेडिशन अ‍ॅप हे अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. मात्र यातील एआर (ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी) तंत्रज्ञानाचा आनंद घेण्यासाठी गुगल एआर कोअर अथवा अ‍ॅपलचे एआर किट असणारा स्मार्टफोन आवश्यक आहे.

Web Title:  Google's Education Expedition App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.