भारीच! गुगलचं नवं फीचर येणार, शब्दांचे उच्चार शिकवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:06 AM2019-11-18T11:06:43+5:302019-11-18T11:18:00+5:30
गुगल प्रश्नांची उत्तरं शोधण्यासोबतच बोलायला देखील शिकवणार आहे.
नवी दिल्ली - गुगल लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने अनेक गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. मात्र आता गुगल प्रश्नांची उत्तरं शोधण्यासोबतच बोलायला देखील शिकवणार आहे. गुगलने आपल्या गुगल सर्चसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना शब्दांचे उच्चार (Pronunciation) चेक करता येणार आहे. याआधी गुगलवर एखादा शब्द सर्च केल्यानंतर त्याचा उच्चार युजर्स ऐकू शकत होते. मात्र आता या नव्या फीचरच्या मदतीने गुगल युजर्सना योग्य उच्चार शिकवणार आहे.
गुगलने या फीचरसाठी मशीन लर्निंगचा वापर केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने कोणत्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो हे पाहिलं जाईल. त्यानंतर गुगलचं स्पीच रिकॉग्निशन टूल बोलण्यात आलेल्या शब्दावर प्रोसेस करेल. तसेच ते एक्स्पर्टच्या उच्चारासोबत मॅच करेल. ज्या शब्दाचा उच्चार करणं अवघड आहे असा शब्द गुगलवर सर्च करा. तिथे स्पीक नाऊ हा ऑप्शन देण्यात येईल. माईक आयकॉनवर टॅप करून तो शब्द युजर्सना बोलता येईल.
युजरने शब्द उच्चारल्यानंतर त्याचा उच्चार योग्य आहे की नाही याची माहिती फीचरच्या मदतीने मिळेल. बोलताना नेमकी काय चूक झाली आहे आणि योग्य उच्चार नेमका काय आहे याबाबत काही सजेशन देण्यात येतील. सध्या या फीचरमध्ये ही सुविधा केवळ इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे. मात्र कंपनीने इतरही भाषेत लवकरच हे उपलब्ध होईल अशी माहिती दिली आहे. सध्या या नव्या फीचरची चाचणी सुरू असल्याची माहिती गुगलने दिली आहे. तसेच हे फीचर मोबाईलसाठी उपलब्ध असून लवकरच त्यात आणखी काही पर्याय देण्यात येणार आहेत.
हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र आता हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे. तसेच युजर्स क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करतील.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकर्स युजर्सचं डिव्हाईस हॅक करू शकतात. गुगल क्रोमच्या या अपडेटच्या माध्यमातून जीरो डे वल्नरबिलिटी ठिक केली असल्याची माहिती डिजिटल ट्रेंड्सने दिली आहे. जुने व्हर्जन असलेल्या क्रोम बाऊजरवर हॅकिंगचं सावट आहे.