Google ची Android 12 OS आणण्याची जोरदार तयारी; जाणून घ्या काय खास, कोणत्या फोनना मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:29 PM2021-02-17T19:29:06+5:302021-02-17T19:39:30+5:30
Android 12 OS launch soon : भारतात अद्याप अँड्रॉईड 11 ऑपरेंटिंग सिस्टिम बऱ्याच मोबाईलला मिळालेली नसताना आता गुगलने अँड्रॉईड 12 लाँचची (Android 12 OS launch) तयारी सुरु केली आहे.
भारतात अद्याप अँड्रॉईड 11 ऑपरेंटिंग सिस्टिम बऱ्याच मोबाईलला मिळालेली नसताना आता गुगलने अँड्रॉईड 12 लाँचची (Android 12 OS launch) तयारी सुरु केली आहे. यामध्ये असे काही जबरदस्त फिचर आहेत, जे युजरसाठी खूप गरजेचे आणि काळानुसार हवे असलेले आहेत. (Google will launch Android 12 OS)
Android 12 OS Developer Preview ला या आठवड्यात 19 फेब्रुवारीला रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये काय काय असणार आहे याची झलक दाखविली जाणार आहे. याच्या काही दिवसांनी Android 12 Beta Preview Version उपलब्ध केले जाणार आहे. त्यानंतर काही महिन्यांत Google I/O Developer Conference मध्ये Android 12 लाँच केले जाणार आहे. ही सिस्टिम अनेक कंपन्या त्यांच्या मोबाईलमध्ये देणार आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीत Android 11 Beta आले होते.
बापरे! तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'हे' App आहे?; लगेचच करा डिलीट नाहीतर फोन होऊ शकतो हॅक
Android 12 मध्ये काय खास?
लीक झालेल्या स्पेसिफिकेशनमध्ये यात स्पेशल गेमिंग मोड असणार आहे. जो गुगलच्या एपीआय तंत्रज्ञानाचा असणार आहे. गेम खेळताना युजर नोटिफिकेशन, ब्राईटनेस आणि आवाज आरामात कंट्रोल करू शकणार आहे. ऑटो रोटेशन सेटिंगमध्ये काही आणखी गोष्टी दिल्या जाणार आहेत. यामध्ये युजरचे बॉडी पोश्चर म्हणजे शरीराची हालचाल होताच स्क्रीन हॉरिझोंटल किंवा व्हर्टिकल मोडमध्ये बदलणार आहे. नवीन प्रायव्हसी फिचरही देण्यात येणार आहेत.
नवा, बजेटमधील infinix smart 5 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि कुठे मिळणार...
Android 12 Device Update List
अँड्रॉईड 12 आली की काही कंपन्या त्यांच्या प्रिमिअम स्मार्टफोनमध्ये देणार आबबेत. मात्र, गुगल ही अपडेट Google Pixel 5, Google Pixel 4a, Pixel 4a 5G, Google Pixel 4, Pixel 4XL, Google Pixel 3 आणि 3 XL, Google Pixel 3a या फोनमध्ये देणार आहे. याशिवाय मोटरोलाचे सर्वफोन आणि OnePlus 7, OnePlus 8 व OnePlus 9 या स्मार्टफोनना मिळण्याची शक्यता आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....