GoPro Hero 10 Black नवीन प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: September 17, 2021 03:35 PM2021-09-17T15:35:15+5:302021-09-17T15:35:28+5:30
GoPro Hero 10 Black अॅक्शन कॅमेरा नव्या GP2 प्रोसेसरसह लाँच झाला आहे, यात HyperSmooth 4.0 नावाचे सुधारित स्टॅबिलायजेशन देण्यात आला आहे.
GoPro Hero 10 Black अॅक्शन कॅमेरा नव्या GP2 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. नवीन अॅक्शन कॅमेरा गेल्यावर्षी लाँच झालेल्या Hero 9 Black ची जागा घेईल. यात सुधारित व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि युआय परफोर्मेंस, हायपरस्मूद 4.0 स्टॅबिलायजेशन आणि हाय रिफ्रेश रेट असलेला फ्रंट डिस्प्ले देण्यात आला आहे.
GoPro Hero 10 Black ची भारतीय किंमत
GoPro Hero 10 Black ची किंमत भारतात 54,500 रुपये ठेवण्यात आली आहे. हा कॅमेरा नोव्हेंबरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. GoPro Hero 10 Black कॅमेरा Amazon, Flipkart, Croma आणि निवडक रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल.
GoPro Hero 10 Black चे स्पेसिफिकेशन्स
GoPro Hero 10 Black मधील जुन्या प्रोसेसरची जागा नवीन GP2 प्रोसेसरने घेतली आहे. त्यामुळे आता कॅमेरा 5.3K 60fps, 4K 120fps आणि 2.7K 240fps पर्यंतचे व्हिडीओ शूट करू शकेल. हा 23 मेगापिक्सलचे फोटो कॅप्चर करू शकतो आणि याची लो-लाईट परफॉर्मन्स सुधारल्याचे कंपनीने म्हटलं आहे. नवीन प्रोसेसरमुळे व्हिडीओ नॉइज रिडक्शन आणि लोकल टोन मॅपिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
GoPro Hero 10 Black मध्ये HyperSmooth 4.0 नावाचा नवीन इम्प्रूव्ड स्टॅबिलायजेशन मिळतो. होरायजन लेवलिंग फीचर आता 45 डिग्री करण्यात आले आहे. तुम्ही 5.3K रिजॉल्यूशनवर शूट केलेल्या व्हिडीओ क्लिपमधून 19.6 मेगापिक्सलचा Still फोटो घेऊ शकता. यात TimeWarp 3.0, HindSight, Scheduled Capture आणि Live Burst सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Hero 10 Black च्या आकारात कोणताही बदल करण्यात आला नाही. फोल्डिंग माउंटिंग फीट, व्हॉइस कंट्रोल आणि 10 मीटर पर्यंत वॉटरप्रूफ सारखे फीचर्स नव्या गोप्रोमध्ये देखील मिळतात. जुने मॉड या अॅक्शन कॅमेऱ्याशी कम्पॅटिबल आहे. नवीन गोप्रोमधून फोनमध्ये मीडिया ट्रान्सफर करण्याचा वेग 30 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच आता वायर्ड कनेक्शनने कॅमेऱ्यातून फोनमध्ये मीडिया फाईल्स ट्रान्सफर करू शकता. तसेच गोप्रो सब्सक्रिप्शन असलेल्या ग्राहकांच्या मीडिया फाईल्स आपोआप क्लाउडमध्ये अपलोड केल्या जातील.