GOQii ने भारतात लाँच केला Smart Vital Junior फिटनेस बॅंड; लहान मुलांसाठी आहेत यात खास फीचर्स  

By सिद्धेश जाधव | Published: June 5, 2021 05:27 PM2021-06-05T17:27:56+5:302021-06-05T17:28:39+5:30

GOQii Smart Vital Junior Launch: लहान मुलांसाठी GOQii ने खास फिटनेस बँड लाँच केला आहे, यात SPo2 सेन्सर देण्यात आला आहे. 

Goqii smart vital junior launched in india will be availble on flipkart and amazon  | GOQii ने भारतात लाँच केला Smart Vital Junior फिटनेस बॅंड; लहान मुलांसाठी आहेत यात खास फीचर्स  

हा बँड सतत रक्तातील ऑक्सिजनच्या स्थरावर लक्ष ठेऊन असतो, SPo2 सेन्सर देण्यात आला आहे.

Next

स्मार्ट वियरेबल्स ब्रँड GOQii ने भारतात लहान मुलांसाठी खास फिटनेस बॅंड लाँच केला आहे. कंपनीने या बँडला Smart Vital Junior (स्मार्ट वायटल जूनियर) असे नाव दिले आहे. या फिटनेस बँडमध्ये 18 स्पोर्ट्स मोड आहेत. या बँडच्या मदतीने स्लिप ट्रेकिंग आणि टेम्परेचर चेकिंग देखील करता येईल. रक्तातील ऑक्सीजनचा स्थर आणि हार्ट-रेट मॉनिटर करण्यासाठी पण या बँडचा वापर करता येईल.  

GOQii Smart Vital Junior फिटनेस बॅंडची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा बॅंड कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल त्याचबरोबर ईकॉमर्स साईट अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील हा फिटनेस बँड उपलब्ध होईल. GOQii Smart Vital Junior फिटनेस बॅंडची किंमत 4,999 रुपये आहे. 

GOQii Smart Vital Junior चे स्पेसिफिकेशन 

GOQii Smart Vital Junior मध्ये 33mm चा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा बँड सतत रक्तातील ऑक्सिजनच्या स्थरावर लक्ष ठेऊन असतो, SPo2 सेन्सर देण्यात आला आहे. यात हार्ट-रेट मॉनिटर आहे तसेच हा शरीराचे तापमान देखील सांगू शकतो.  

वॉकिंग, रनिंग आणि योगा सारखे 18 स्पोर्ट्स मोड्सचा समावेश GOQii Smart Vital Junior मध्ये करण्यात आला आहे. या बँडच्या मदतीने तुमचा फोन शोधात येईल. तसेच यात अलार्म लावता येईल आणि तुमच्या फोनवर येणाऱ्या कॉल आणि मेसेजेसच्या नोटिफिकेशन्स देखील या वॉचवर येतील. GOQii च्या या बँडच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांच्या स्वस्त्यावर लक्ष ठेऊ शकतील.  

Web Title: Goqii smart vital junior launched in india will be availble on flipkart and amazon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.