Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका; केंद्र सरकारने जारी केले 7 फ्री टूल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:46 PM2021-02-10T16:46:24+5:302021-02-10T16:47:31+5:30

Google Chrome : MeitY ने हे पाऊल सायबर क्लीन सेंटर (बॉटनेट क्लीनिंग अँड मालवेअर अ‍ॅनालिसिस सेंटर) म्हणून उचललं आहे.

government 7 free tools for protect smartphones and computers | Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका; केंद्र सरकारने जारी केले 7 फ्री टूल्स

Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका; केंद्र सरकारने जारी केले 7 फ्री टूल्स

Next

नवी दिल्ली - Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) भारतीय युजर्स संगणक, स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांना नवीन व्हायरस बॉटनेटच्या अटॅकपासून बचाव करण्यासाठी 7 नवीन फ्री टूल्स दिली आहेत. MeitY ने हे पाऊल सायबर क्लीन सेंटर (बॉटनेट क्लीनिंग अँड मालवेअर अ‍ॅनालिसिस सेंटर) म्हणून उचललं आहे.

इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) मार्फत हे टूल्स क्विक हील आणि ईस्कॅन सारख्या पार्टनर्ससोबत ऑपरेट केले जात आहेत. बॉटनेट्स हा इन्फेक्टटेड डिव्हाईसचा एक गट आहे जो हानिकारक काम करण्यासाठी एकत्रित काम करतो. हे डिव्हाईस हॅकर्सद्वारे नियंत्रित केले जातात. याच दरम्यान युजर्सना स्पॅम पाठवले जात आहेत. डेटा चोरी केला जात आहे. अनऑथोराइज्ड अ‍ॅक्सेस आहे ज्याद्वारे डीडीएसएसवर अटॅक केला जात आहे. या प्रकारचा अटॅक टाळण्यासाठी फ्री टूल्सबाबत जाणून घेऊया.

Microsoft WIndows साठी Quick Heal Free Bot Removal Tool : सायबर सुरक्षा कंपनी क्विक हील सीईआरटी-इन सह मोफत बॉट रिमूव्हिंग टूल ऑफर करत आहे. आपण हे टूल फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो.

WIndows PC साठी eScan अँटीव्हायरसचं फ्री बॉट रिमूव्हल टूल : ईस्केन अँटीव्हायरससारख्या विंडोज पीसीसाठी आणखी एक फ्री बॉट काढण्याचं टूल्स दिलं गेलं आहे. आपण हे टूल फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो.

अँड्रॉईड फोनसाठी eScanAV CERT-In टूलकिट : सीईआरटी-इनने ईएसकेन स्मार्टफोन सेफ्टी टूलकिट सादर केलं आहे. हे टूल बॉट्सशी लढण्यासाठी डिझाईन केलं आहे. Google Play Store वरून हे फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो.

USB Pratirodh डेस्कटॉप सिक्योरिटी सॉल्यूशन : USB Pratirodh हे एक डेस्कटॉप सिक्योरिटी सॉल्यूशन आहे. पेन ड्राईव्ह, एक्सटरनल हार्ड ड्राइव्ह, सेल फोन आणि सपोर्टिड यूएसबी मास स्टोरेज डिव्हाईससारख्या रिमूव्हेबल स्टोरेज मीडिया यूजला कंट्रोल करतं. आपण हे टूल फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो.

AppSamvid :  विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसाठी AppSamvid हे एक डेस्कटॉप बेस्ड अ‍ॅप्लिकेशन वाइटलिस्टनिंग सॉल्यूशन आहे. आपण हे टूल फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो.

हानिकारक HTML अटॅकपासून वाचण्यासाठी फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी  ब्राऊजर JSGuard : ब्राउझर जेएसगार्ड हा ब्राऊजर विस्ताराचा एक प्रकार आहे जो ह्युरिस्टिक्सवर आधारित वेब ब्राऊजरद्वारे हानिकारक एचटीएमएल आणि जावास्क्रिप्ट हल्ले शोधतो आणि संरक्षित करतो. आपण हे टूल फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो.

गूगल क्रोमसाठी ब्राऊजर JSGuard : जर तुम्ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर सुरक्षेसाठी आपल्या सिस्टममध्ये हे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. JSGuard हे फ्रीमध्ये डाऊनलोड करता येतं. 

Web Title: government 7 free tools for protect smartphones and computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.