तुमच्या व्हॉट्सॲप अन् फोन कॉल्सवर सरकारची नजर?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:52 AM2024-02-22T06:52:39+5:302024-02-22T06:52:50+5:30
सर्व सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येईल. आपले मोबाइल मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नका.
समाजमाध्यमांवर एक छायाचित्र शेअर करण्यात येत असून, यात केंद्र सरकार सोशल मीडिया आणि फोन कॉल्सवर भारत सरकारच्या ‘नवीन कम्युनिकेशन नियमांनुसार’ नजर ठेवणार असल्याचा दावा केला जात आहे.
सर्व सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येईल. आपले मोबाइल मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नका. राजकारणाविषयाची संबंधित, सरकार किंवा पंतप्रधानांविषयी कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ पोस्ट करू नका, असे या छायाचित्रात म्हटले आहे.
व्हॉट्सॲपवर तीनही टीक लाल असतील तर सरकार लवकर आपल्याविरोधात कारवाई सुरू करणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे; मात्र सदर छायाचित्र दिशाभूल करणारे, खोटी माहिती पसरवणारे आहे. भारत सरकारने असे कोणतेही नियम लागू केलेले नाहीत. अशी कोणतीही फेक माहिती शेअर करू नका, असे आवाहन ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने केले आहे.