सावधान! फोन, लॅपटॉप युजर्सना धोका; बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं, सरकारी एजन्सीचा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 01:55 PM2024-03-26T13:55:32+5:302024-03-26T13:57:21+5:30
भारत सरकारची एजन्सी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-in) अलीकडेच एक सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे.
इंटरनेटच्या जगात विविध धोके आणि व्हायरस आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारे लोकांचं मोठं नुकसान करू शकतात. भारत सरकारची एजन्सी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-in) अलीकडेच एक सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये काही वल्नेरेबिलिटी आढळल्या.
कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने भारतातील फायरफॉक्स ब्राउझरबाबत इशारा जारी केला आहे. भारतीय सायबर सिक्योरिटी टीमने अनेक प्रकारच्या वल्नेरेबिलिटी शोधल्या आहेत ज्यांचा हॅकर्सद्वारे फायदा घेतला जाऊ शकतो. या वल्नेरेबिलिटीच्या मदतीने, हॅकर्स तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसू शकतात आणि डेटा देखील चोरू शकतात.
CERT-in ने सांगितले की, Mozilla प्रोडक्टमध्ये अनेक वल्नेरेबिलिटी आढळून आल्या आहेत. ही एक प्रकारची कमजोरी आहे ज्याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या हँडसेटचा एक्सेस मिळवू शकतात आणि डेटा चोरू शकतात. तुमचा मोबाईल किंवा संगणक/लॅपटॉपचा देखील एक्सेस करु शकता. वास्तविक, Mozilla Firefox चा वापर लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन इत्यादींमध्ये केला जातो.
वल्नेरेबिलिटी विशेषतः Firefox versions prior to 124 , Firefox ESR versions prior to 115.9 आणि Mozilla Thunderbird version prior to 115.9 च्या व्हर्जनमध्ये आढळतात. या व्हर्जनचा वापर करणारे युजर्स लगेचच आपलं व्हर्जन अपडेट करतात.
सुरक्षिततेसाठी त्वरित करा 'हे' काम
Mozilla प्रोडक्ट युजर्सनी आपल्या सुरक्षिततेसाठी सर्वप्रथम लेटेस्ट व्हर्जनसह अपडेट करायला हवं. याशिवाय युजर्सनी ऑटोमॅटिक लेटेस्ट अपडेट इनेबल करायला हवं. याशिवाय युजर्स आपल्या डिव्हाईसमध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल करू शकतात.