अँड्रॉईड युजर्स सावधान! 'हे' काम लगेच करा अन्यथा होईल मोठं नुकसान; सरकारने दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:20 PM2022-05-11T16:20:47+5:302022-05-11T16:22:17+5:30

इंडियन कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पॉन्स टीमने (CERT) अँड्रॉईड युजर्सला सतर्क केलं.

government issues warning for these android smartphone users | अँड्रॉईड युजर्स सावधान! 'हे' काम लगेच करा अन्यथा होईल मोठं नुकसान; सरकारने दिला इशारा 

अँड्रॉईड युजर्स सावधान! 'हे' काम लगेच करा अन्यथा होईल मोठं नुकसान; सरकारने दिला इशारा 

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात आता मोठी वाढ होत आहे. याच दरम्यान अँड्रॉईड युजर्सला सरकारने सावध केलं आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पॉन्स टीमने (CERT) अँड्रॉईड युजर्सला सतर्क केलं. खासकरून Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L सह येणारे स्मार्टफोन्स वापरणाऱ्या युजर्सला सावध करण्यात आलं आहे. या अँड्रॉईड व्हर्जनमध्ये त्रुटी आढळली आहे. 

त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स युजर्सची महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. CERT ने म्हटले आहे की, अँड्रॉईड ओएसमध्ये फ्रेमवर्क, सिस्टम कंपोनेंट, मीडिया प्रोव्हायडर कंपोनेंट, कर्नल कंपोनेंट, MediaTek कंपोनेंट, Qualcomm कंपोनेंट, Qualcomm क्लोज्ड सोर्स कंपोनेंट अँड सिस्टम त्रुटीचे कारण आहे.

त्रुटीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खासगी माहिती चोरी करू शकतात. हॅकर्स टार्गेटेड सिस्टमला कॉप्रोमाइज्ड करून युजर्सची माहिती मिळवू शकतात. Google ने Android OS मधील त्रुटीबाबत गेल्या महिन्यात सिक्योरिटी पॅच जारी केला होता. लेटेस्ट Android Security Bulletin नुसार, सिक्योरिटी पॅच लेवल्स 2022-05-01 नंतर या त्रुटींना दूर करण्यात आले आहे. कंपनीनुसार, या त्रुटींमध्ये सर्वाधिक धोकादायक Framework कंपोनेंटमधील वल्नेरिबिलिटी आहे.

हॅकर्सला युजर्सच्या डिव्हाइसचा एक्सेस मिळू शकता. त्यामुळे युजर्सला त्वरित लेटेस्ट ओएस अपडेटला इंस्टॉल करण्यास सांगितले आहे. तुम्ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमला फोनच्या सेटिंग्समध्ये जावून तपासू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन अबाउट डिव्हाइस अथवा जनरल सेटिंग्सवर टॅप करायचे आहे. त्यानंतर अँड्रॉईड सिस्टम अपडेटवर क्लिक केल्यास अपडेटची माहिती मिळेल. अपडेट झाल्यानंतर डाऊनलोड करून इंस्टॉल करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: government issues warning for these android smartphone users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.