Twitter व्हेरिफिकेशन : 661 नव्हे तर 780 रुपये मोजावे लागतील, सरकारला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:53 PM2022-11-02T14:53:13+5:302022-11-02T14:54:33+5:30

Twitter : सर्व प्रकारच्या आयटी सॉफ्टवेअर पुरवठ्यासाठी जीएसटी दर 18 टक्के आहे. 

government will take 18 gst for twitter verification after elon musk | Twitter व्हेरिफिकेशन : 661 नव्हे तर 780 रुपये मोजावे लागतील, सरकारला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी

Twitter व्हेरिफिकेशन : 661 नव्हे तर 780 रुपये मोजावे लागतील, सरकारला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी

googlenewsNext

नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) व्हेरिफिकेशनची समस्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी, इलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्पष्ट केले आहे की, आता युजर्संना व्हेरिफिकेशनसाठी 8 डॉलर इतके चार्ज द्यावे लागेल. पण, ही बाब एवढ्यावरच थांबत नाही, तर इलॉन मस्क यांना महिन्याला 8 डॉलर म्हणजेच जवळपास 661 रुपये चार्ज दिल्यानंतर युजर्सला त्यावर 18 टक्के जीएसटीही (GST) भरावा लागणार आहे. दरम्यान, जीएसटी दर आयटी सेवांसाठी (सॉफ्टवेअर) निश्चित केला आहे. सर्व प्रकारच्या आयटी सॉफ्टवेअर पुरवठ्यासाठी जीएसटी दर 18 टक्के आहे. 

ट्विटरच्या अधिग्रहणानंतर, इलॉन मस्क यांनी दरमहा 8 डॉलर दरमहा व्हेरिफिकेशन चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतात हे चार्ज थोडे कमी होण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध देशांतील उत्पन्नानुसार चार्ज निश्चित केले जातील. पुढील आठवड्यात चार्ज वसुली सुरू होऊ शकते. यामुळे, लोकांना ट्रोल आणि स्पॅमपासून सुटका मिळेल आणि ब्लू टिक (Blue Tick) असलेल्या लोकांना सर्च, रिप्लाय आणि मेंशनमध्ये प्राधान्य मिळेल, तसेच त्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करण्याची परवानगी मिळू शकते. भारतात हे चार्ज 200 ते 250 रुपये प्रति महिना असू शकते.

दरम्यान, भारतात अडीच कोटी युजर्स ट्विटर प्लॅटफॉर्म वापरतात. ट्विटरसाठी भारत ही तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ट्विटर आपल्या व्हेरिफिकेशन प्रोसेस दरम्यान कोणत्याही युजर्सचे अकाउंट व्हेरिफिकेशन करते आणि यासाठी आता लोकांना कदाचित पैसे द्यावे लागतील. सध्या ही सुविधा फक्त ऐच्छिक आहे आणि जर तुम्ही स्वतः ती मागितली असेल, तर एका प्रक्रियेनंतर तुमचे अकाउंट व्हेरिफाय केले जाते आणि तुमच्या नावासमोर एक ब्लू टिक दिसून येते.

नेत्यांना विशेष टॅग देणार
आता ट्विटर नेत्यांना आणि सेलिब्रिटींना सेकंडरी टॅग देणार असल्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली. मस्क यांनी ज्या सेकंडरी टॅगची घोषणा केली, तो टॅग अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना देण्यात आला आहे. बायडन यांच्या नावाखाली United States Government Official असा सेकंडरी टॅग आहे. पण, हा टॅग भारतातील नेत्यांना अजुनही देण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावासमोर असा सेकंडरी टॅग दिसत नाही. पण, आता ट्विटरला ब्लू टिक चार्ज दिल्यानंतर त्यात बदल दिसतील, अशी शक्यता आहे.

54 हजार भारतीयांचे अकाउंट्स बॅन...
आता ट्विटरने हजारो भारतीयांवर कारवाई करत देशातील 52,141 युजर्सचे अकाउंट्स बॅन केले आहेत. दर महिन्याप्रमाणे ट्विटरने आपला मंथली रिपोर्ट सादर केला, यात ही माहिती समोर आली आहे. हे अकाउंट्स 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान बंद केले आहेत. हे अकाउंट्स बाल लैंगिक शोषण, नग्नता आणि याप्रकारच्या कंटेंटला शेअर केल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. इलॉन मस्क आल्यानंतर ट्विटरने 1982 अकाउंट्सना दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली बॅन केले आहे.

Web Title: government will take 18 gst for twitter verification after elon musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.