सरकारचा इशारा! काही सेकंदात रिकामे होईल तुमचे खाते, चुकूनही 'हे' अॅप डाउनलोड करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 09:20 PM2021-12-17T21:20:38+5:302021-12-17T21:21:37+5:30

मागील काही काळापासून भारतात डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण, यादरम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही तेवढीच वाढ झाली आहे.

Government's warning! Your account will be empty in a few seconds, don't do these mistakes | सरकारचा इशारा! काही सेकंदात रिकामे होईल तुमचे खाते, चुकूनही 'हे' अॅप डाउनलोड करू नका

सरकारचा इशारा! काही सेकंदात रिकामे होईल तुमचे खाते, चुकूनही 'हे' अॅप डाउनलोड करू नका

Next

नवी दिल्ली: मागील काही काळापासून भारतात डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण, यादरम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही तेवढीच वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यसाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. कोरोनाच्या काळात तर सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळेच आता सर्वांनी खबरदार राहण्याची गरज आहे. केंद्र सरकारने याबाबत नुकताच अलर्ट जारी केला आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली खोट्या अॅपच्या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे. सायबर फ्रॉडपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी सायबर मित्र वेळोवेळी सतर्क करत असतात. तसेच, सायबर दोस्त हे गृह मंत्रालयाचे ट्विटर हँडल आहे, जे वेळोवेळी सायबर सुरक्षेची माहिती शेअर करते.

सायबर दोस्तने अलर्ट जारी केला

सायबर दोस्त अशा बनावट अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा वेळोवेळी देत असतात. सध्या कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या नावाने अनेकांची फसवणूक होत आहे. याबाबत सायबर दोस्तने ट्विट केले की, 'सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बनावट अॅप्सपासून दूर राहा. कसून चौकशी केल्याशिवाय तुमच्या मोबाइलमध्ये कोणतेही बनावट मोबाइल अॅप डाउनलोड करू नका. तसेच संबंधित लिंक उघडू नका.

गृहमंत्रालयाचे अलर्ट
गृह मंत्रालयाने सायबर मित्रामार्फत सांगितले की, कर्ज देणाऱ्या कंपन्यांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर शोधणे आवश्यक आहे. कोणतेही कर्ज देणारे अॅप डाउनलोड करताना काळजी घ्या, अन्यथा तुमची वैयक्तिक माहिती, डेटा धोक्यात येऊ शकतो. कागदपत्र, पेमेंट करताना संबंधित वेबसाइट किंवा URL तपासा.

पॉप-अपद्वारे सायबर अटॅक
सायबर गुन्हेगार संगणक प्रोग्रामद्वारे पोलिसांच्या नावाने पॉप-अप वापरतात. अश्‍लील मजकूरामुळे वापरकर्त्याचा संगणक ब्लॉक करण्यात आल्याचा पॉप-अप अहवाल सायबर गुन्हेगार पोलिसांच्या नावाने पाठवतात. पॉप-अपमध्ये असेही म्हटले जाते की संगणक अनब्लॉक करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. यांसह इतर विविध गोष्टींमधून तुमचे कॉम्प्युटर किंवा मोबाईल हॅक केला जातो आणि तुमची महत्वाची माहिती चोरली जाते.

काय करू नये?
सायबर दोस्तने अशा नोटिसांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच, आपल्या संगणकाच्या अँटीव्हायरस प्रोग्रामवर वेळोवेळी क्लिक करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, तुम्हाला पॉप-अपमध्ये पैसे देण्यास सांगितले असल्यास, कोणतेही पेमेंट करू नये. पॉप-अप किंवा संदेशातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.

Web Title: Government's warning! Your account will be empty in a few seconds, don't do these mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.