Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 06:56 PM2021-09-18T18:56:02+5:302021-09-18T18:58:28+5:30

Google लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल जोडण्याचा विचार करत आहे.

Great gift from Google; Free TV channels to watch soon? | Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स?

Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स?

googlenewsNext
ठळक मुद्देGoogle लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल जोडण्याचा विचार करत आहे.

Google लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल जोडण्याचा विचार करत आहे. Google TV हा एक Android आधारित स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म आहे, जो Chromecast वर चालतो आणि तो सोनी, TCL सह इतर स्मार्ट टीव्हींवरही चालू शकतो. Google TV यापूर्वीपासूनच अनेक स्ट्रिमिंग अॅप्स म्हणजेच Disney+ Hotstar, Netflix आणि अन्य अॅप्सनाही सपोर्ट करतो. Google TV लवकरच आपल्या युझर्सना मोफत टीव्ही चॅनेल पाहण्याची भेट देण्याची शक्यता वर्तनवण्यात येत आहे. 

Protocol च्या एका रिपोर्टनुसार Google फ्री आणि अॅड सपोर्ट असलेल्या स्ट्रिमिंग टेलिव्हिजन प्रोव्हाडर्सशी हे चॅनेल आपल्या स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्मवर जोडण्याच्या शक्यतांवर चर्चा करत आहे. यावर कमर्शिअल ब्रेकसोबत ट्रेडिशनल टीव्हीसारखाही अॅक्सेस मिळेल. दरम्यान, येणाऱ्या काही दिवसांमध्ये Google TV वर हे चॅनेल्स लाँच केले जाऊ शकतात. परंतु कंपनी पुढील वर्षाच्या सुरूवातीला कधीही आपल्या स्मार्ट टीव्ही पार्टनर्ससोबत या इनिशिएटिव्हच्या घोषणेची वाट पाहू शकत असल्याचंही म्हटलं जात आहे.

युझेसबद्दल सांगायचं झालं तर युझर्सना चॅनेल्सद्वारे मेन्यू ब्राऊज करण्यासाठी एक निराळा लाईव्ह टीव्ही मेन्यू मिळेल. स्मार्ट टीव्हीवर स्ट्रीमिंग चॅनेल्स ओव्हर द एअर प्रोग्रामिंगसोबत सादर केले जातात जे अॅन्टिनासोबत अॅक्सेस केले जाऊ शकतात. यापूर्वी Roku नेदेखील अशाप्रकारचा एक प्लॅटफॉर्म लाँच केला होता. यावर २०० पेक्षा अधिक फ्री चॅनेल्स मिळतात. सॅमसंग आणि एलजीनं आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्री स्ट्रिमिंग चॅनेल्स इंटिग्रेट केले आहेत.

Web Title: Great gift from Google; Free TV channels to watch soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.