ही दिवाळी Honor वाली...! सणासुदीला मोठा डिस्काऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 01:24 PM2018-10-25T13:24:27+5:302018-10-30T15:08:39+5:30
नवी दिल्ली : हुवाई समुहाच्या हॉनर या मोबाईल निर्मात्या कंपनीने उत्सवकाळात ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत हात मिळवणी केली आहे. या ...
नवी दिल्ली : हुवाई समुहाच्या हॉनर या मोबाईल निर्मात्या कंपनीने उत्सवकाळात ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत हात मिळवणी केली आहे. या काळात अॅमेझॉनवर मोठ्या डिस्काऊंटमध्ये हॉनरचे मोबाईल उपलब्ध होणार आहेत. तसेच हॉनरच्या ई-स्टोअरवरही डिस्काऊंटच्या किंमतीमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत.
अॅमेझॉनवर सणासुदीच्या काळात हॉनरचा सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन Honor Play आतापर्यंतच्या सर्वांत चांगल्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. तसेच या काळातच Honor Store वरही हा फोन उपलब्ध होणार आहे.
हुवाई ग्रुपचे उपाध्यक्ष (विक्री) पी संजीव यांनी ही माहिती दिली. हॉनर हा ब्रँड ग्राहकांना नेहमीच स्मार्टफोन वापरण्याचा अनोखा अनुभव देतो. पहिल्या दिवाळी सेलवेळी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे यंदा अॅमेझॉनसह आमच्या वेब स्टोअरवरही डिस्काऊंटमध्ये विक्री केली जाणार आहे.
नुकताच लाँच झालेला Honor 8X (4+64GB) हा अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलकाळात 14999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.याचबरोबर Honor Play चा 4+64GB व्हेरिअंटही नुकतच लाँच केलेला आहे. याची किंमत 17999 रुपये आहे. यावर 3 हजार रुपयांची एक्सट्रा एक्स्चेंज ऑफर देण्यात येणार आहे.
Apne gharwali Diwali ko banaye aur bhi khaas, #Honor9N ke saath!
— Honor India (@HiHonorIndia) October 28, 2018
Mirror your best festive look & capture stunning selfies with #Honor9N & make #YehDiwaliHonorWali!
Buy the captivating beauty on @Flipkart today! https://t.co/Zl5VnqPmagpic.twitter.com/PDLPcKD5oS
तर इतर मोबाईलवरही 8 हजार रुपयांपर्यंतचं डिस्काऊंट देण्यात येणार आहे. Honor 9N हा 9,999 ते 11999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. Honor 7A वर 5999 तर Honor 10 या मोबाईलवर 8 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.
Shoot minute details clearly with 16x slow-motion mode (480fps) in the performance beast#Honor8X!
— Honor India (@HiHonorIndia) October 28, 2018
Buy the Xtraordinary smartphone starting at INR 14,999 on @amazonIN -https://t.co/z1ZAfFNfD1 - today! #BeyondLimitspic.twitter.com/H4Nl5YdLmS