HAPPY BIRTHDAY GOOGLE: 19 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
By Namdeo.kumbhar | Published: September 27, 2017 05:45 AM2017-09-27T05:45:57+5:302017-09-27T05:46:08+5:30
इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे. गुगल सर्च इंजिन हे नेटक-यांचे सर्वांचे लाडके शोध साधन आहे.
मुंबई - इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे. गुगल सर्च इंजिन हे नेटक-यांचे सर्वांचे लाडके शोध साधन आहे. आपल्या 19व्या वाढदिवसानिमित्त गुगल Birthday Surprise Spinner घेऊन आलं आहे. याद्वारे नेटकरी आपलं मनोरंजन करू शकतो.
मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी 27 सप्टेंबर 1998मध्ये लावलेल्या छोट्याशा गुगलच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. वोजसिकी सध्या गुगल कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत. 10 ऑगस्ट 2015 पासून सुंदर पिचाई गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी निवड झाली. गुगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.
गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल, याचा विचार केला आहे. 1998मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाट्यमयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगल सर्चचे प्रमुख अमित सिंघल यांनी त्यांच्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे, की गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोट्याशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. एवढेच नव्हे, गुगल नाऊच्या रूपाने आवाज ओळखण्याची सुविधा त्यात आहे.
सर्च इंजिन लँड या डॅनी सुलीवान यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे, की मुख्य सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र हे नवीन अलगॅरिदमवर आधारित असून त्याचे सांकेतिक नाव हमिंगबर्ड असे आहे, अतिशय गुंतागुंतीच्या शोध सूचना यात हाताळल्या जातात. प्रत्येक वेळी नवनवीन बदल करणा-या गुगलने आपल्या डुडलच्या माध्यमातून दिवसाचे महत्व सांगणारे होमपेज तयार करण्याची कल्पना यशस्वरीत्या सुरू केली आणि ती जगप्रसिद्धही झाली.