Happy Birthday Google: कशी झाली गुगलची सुरुवात? जाणून घ्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 01:38 PM2018-09-27T13:38:10+5:302018-09-27T13:39:59+5:30

Happy Birthday Google: जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलचा आज २०वा वाढदिवस आहे. गुगलने आपल्या २०व्या वाढदिवसानिमित्त खास डूडल तयार केलं आहे.

Happy Birthday Google: know interesting things about google | Happy Birthday Google: कशी झाली गुगलची सुरुवात? जाणून घ्या खास गोष्टी

Happy Birthday Google: कशी झाली गुगलची सुरुवात? जाणून घ्या खास गोष्टी

Next

जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलचा आज २०वा वाढदिवस आहे. गुगलने आपल्या २०व्या वाढदिवसानिमित्त खास डूडल तयार केलं आहे. आपण रोजच कोणत्या ना कोणत्या कामासाठी गुगलचा वापर करतो. पण गुगल सर्च इंजिन कसं झालं हे तुम्हाला माहीत आहे? चला जाणून घेऊया काही खास गोष्टी...

गुगलच्या खास गोष्टी

१) २० वर्षांआधी गुगलला स्टानफोर्ड यूनिव्हर्सिटीतील दोन पीएचडी विद्यार्थी लॅरी पेज आणि सर्गे ब्रिनने सुरु केले होते. त्यांनी पहिले Google.stanford.edu यावर एक इंटरनेट सर्च इंजिन तयार केलं. याचं नाव BackRub ठेवलं गेलं नंतर ते बदलून गुगल करण्यात आलं.

२) १५ सप्टेंबर १९९५ मध्ये Google.com डोमेनचं रजिस्ट्रेशन केलं गेलं होतं. पण गुगल कंपनी म्हणून ४ सप्टेंबर १९९८ मध्ये रजिस्टर केली गेली. 

३) १९९८ मध्ये जेव्हा गुगलची सुरुवात झाली तेव्हा जगभरात वर्ल्ड वाइड वेब(WWW) वर साधारण २५ मिलियन पेज उपलब्ध होते. त्यावेळी गुगलचं अल्गोरिदम चांगलं होतं. त्यावेळी काही सर्च केलं तर २.५ कोटी पेजची माहिती मिळत होती.

४) गुगल तयार करण्याचा उद्देश जगभरातील माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हा होता. 

५) आज गुगल जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. आज गुगल ऑपरेटिंग सिस्टमपासून ते मोबाईलही तयार करते. 

६) गुगल आज १५० पेक्षाही अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

Web Title: Happy Birthday Google: know interesting things about google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.