Happy birthday Google : गुगल ऐन तारुण्यात, 20 वर्षांत प्रत्येकाच्या हृदयात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:30 AM2018-09-27T08:30:37+5:302018-09-27T09:03:37+5:30

Happy birthday Google : आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन गुगलचा आज वाढदिवस आहे.

Happy birthday Google : Search giant celebrates 20th birthday with special Doodle | Happy birthday Google : गुगल ऐन तारुण्यात, 20 वर्षांत प्रत्येकाच्या हृदयात

Happy birthday Google : गुगल ऐन तारुण्यात, 20 वर्षांत प्रत्येकाच्या हृदयात

Next

मुंबई - आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन गुगलचा आज वाढदिवस आहे.  गुगल सर्च इंजिन हे नेटक-यांचे सर्वांचे लाडके शोध साधन आहे.  गुगलचा आज 20वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने गुगल खास डुडलही तयार केले आहे. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी 27 सप्टेंबर 1998मध्ये लावलेल्या छोट्याशा गुगलच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.  गुगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे. 

गुगलचं नामकरण एका चुकीच्या स्पेलिंगमुळे झाली, गुगलचं स्पेलिंग 'Google' असं आहे पण खरं तर ते 'Googol’ असं ठेवायचं होतं. पेज आणि ब्रेन यांनी सुरुवातीला गुगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं, मात्र त्यानंतर गुगल असं नाव करण्यात आले.

गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल, याचा विचार केला आहे. 1998मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाट्यमयरित्या बदललं व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. 

Web Title: Happy birthday Google : Search giant celebrates 20th birthday with special Doodle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.