सावधान! 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड'चा मोठा धोका; एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 02:12 PM2022-10-04T14:12:53+5:302022-10-04T14:52:31+5:30
Harly Malware : जोकर मालवेयर नंतर हार्ली मालवेयर लोकांना टार्गेट करत आहे.
Android युजर्सवर नेहमी मालवेयर अटॅक किंवा व्हायरसचा धोका कायम असतो. Joker Malware अनेकांना माहिती आहे. परंतु, आता जोकर मालवेयर नंतर हार्ली मालवेयर (Harly Malware) लोकांना टार्गेट करत आहे. डीसी कॉमिक्स युनिव्हर्समध्ये बॅटरी सीरीजचा एक कॅरेक्टर आहे जोकर, याच्या गर्लफ्रेंडचे नाव हार्ली क्विन आहे. या पॉप्यूलर कॅरेक्टरच्या नावावर आता व्हायरसचे नाव ठेवले गेले आहे. या दोन्ही मालवेयर्समध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया...
Joker आणि Harly मालवेयर मध्ये काय आहे फरक?
जोकर मालवेयर आणि हार्ली मालवेयरमध्ये मोठे अंतर म्हणजे जोकर मालवेयर डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर मालिशियस कोडला डाउनलोड करते. हे खऱ्या (ओरिजनल) एप्स प्रमाणे दिसते. तर हार्ली मालवेयर आपल्यासोबत मेलिशियस कोडला घेऊन येते. याला रिमोटली कंट्रोलची गरज नाही.
Harly Malware पासून कसा आहे धोका?
हार्ली मालवेयरला या प्रमाणे डिझाइन करण्यात आले की, युजर्सला न सांगता पेड सब्सक्रिप्शनसाठी तुमचे अकाउंट साइन इन करते. तुमच्या फोनमध्ये आल्यानंतर व्हायरस महाग सबस्क्रीप्शनसाठी साइन इन करते. याचा महिन्याचा खर्च फोन बिलात जोडले जाते.
हे मालवेयर ऑटोमेटेड नंबरवर फोन कॉल किंवा एसएमएस व्हेरिफिकेशन द्वारे सब्सक्रिप्शनला एक्टिवेट करते. Kaspersky च्या माहितीनुसार, मेलवेयर 190 हून जास्त अँड्रॉयड एप्समध्ये मिळाले आहे. या मोबाइल एप्सला लाखो युजर्सकडून डाउनलोड करण्यात आले आहे.
Harly Malware 'असा' करा बचाव
हार्ली मालवेअर सुरक्षित दिसणार्या एप्सद्वारे गुगल प्ले स्टोअरमध्ये दाखल झाला आहे, परंतु काही खबरदारी आहेत ज्यांचे पालन केल्यास तुम्ही या व्हायरसपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
Google Play Store वरून कोणतेही एप डाउनलोड करण्यापूर्वी, कृपया लोकांचे रिव्ह्यू वाचा. कमी रेटिंगकडे लक्ष द्या.
तुम्हाला आवश्यक नसलेले एप डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे टाळा, असे केल्याने तुमच्या डिव्हाइसवर व्हायरस येण्याचा धोका थोडा कमी होतो.
तुमच्या डिव्हाइससाठी पेड अँटीव्हायरस सोल्यूशन खरेदी करा जे तुम्हाला तुमच्या हँडसेटचे व्हायरसपासून संरक्षण करण्यात मदत करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"