हर्मनच्या स्मार्ट स्पीकरची घोषणा

By शेखर पाटील | Published: December 12, 2017 01:04 PM2017-12-12T13:04:19+5:302017-12-12T14:35:23+5:30

ध्वनी उपकरणांमधील अग्रगण्य नाव असणार्‍या हर्मन इंटरनॅशनलने भारतीय बाजारपेठेत आपला हर्मन कार्दोन अल्युरा हा स्मार्ट स्पीकर लाँच केला असून यात अमेझॉनच्या अलेक्झा या व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट आहे.

Harmon's smart speaker announcement | हर्मनच्या स्मार्ट स्पीकरची घोषणा

हर्मनच्या स्मार्ट स्पीकरची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देआपण आता शब्दांवरून ध्वनी आज्ञावलीच्या युगाकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरनेटवरील व्हाईस सर्चपासून ते विविध उपकरणांमध्ये ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा उपयोग केला जात आहे.

आपण आता शब्दांवरून ध्वनी आज्ञावलीच्या युगाकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात अगदी इंटरनेटवरील व्हाईस सर्चपासून ते विविध उपकरणांमध्ये ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा उपयोग केला जात आहे. आपण लवकरच विविध उपकरणांशी संवाद साधून त्यांना वापरणार आहोत. याचा प्रारंभ स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातून कधीपासूनच सुरू झाला आहे. या क्षेत्रात गुगल आणि अमेझॉनसारख्या मातब्बर टेक कंपन्यांनी उडी घेतल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. यातून गुगल असिस्टंट, अमेझॉनचा अलेक्झा आणि अ‍ॅपलचा सिरी या व्हर्च्युअल असिस्टंटमध्येही स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष करून गुगल असिस्टंट आणि अलेक्झा यांना थर्ड पार्टीजसाठी खुले करण्यात आल्यानंतर या दोन्ही असिस्टंटमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. या अनुषंगाने भारतीय ग्राहकांसाठी हर्मन इंटरनॅशनल कंपनीने आपला हर्मन कार्दोन अल्युरा हा स्मार्ट स्पीकर लाँच केला असून यात अमेझॉनच्या अलेक्झा असिस्टंटचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

हर्मन कार्दोन अल्युरा हा स्मार्ट स्पीकर ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून २२,४९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. प्रारंभी हे मॉडेल फक्त अमेझॉन प्राईमच्याच ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. यात अन्य स्मार्ट स्पीकरप्रमाणे युजर व्हाईस कमांडच्या सहाय्याने विविध कामे करून घेऊ शकतो. यात कॉल/एसएमएस करणे, कॉल रिसीव्ह करणे, इंटरनेट सर्चींग, शॉपींग, बातम्या ऐकणे, हवामानासह अन्य अलर्टस्ची माहिती आदींचा समावेश आहे. याच्या माध्यमातून घरातील लाईट चालू-बंद  करता येतात. ब्ल्यु-टुथच्या मदतीने हा स्पीकर स्मार्टफोन वा अन्य स्मार्ट उपकरणांशी जोडता येतो. यामध्ये अतिशय दर्जेदार वुफर्स आणि ट्युटर्स असून याच्या मदतीने ३६० अंशातील ध्वनीची अनुभुती घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्ट स्पीकर गोलाकार आकाराचा असून यावर एलईडी लाईटदेखील देण्यात आले आहेत.
 

Web Title: Harmon's smart speaker announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.