हुआवेचे दोन फिटनेस ट्रॅकर्स
By शेखर पाटील | Published: July 28, 2017 06:57 PM2017-07-28T18:57:44+5:302017-07-28T18:58:31+5:30
हुआवे कंपनीने हृदयाच्या ठोक्यांची मोजणी करण्यास सक्षम असणारे हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो हे दोन फिटनेस ट्रॅकर्स जाहीर केले आहेत.
हुआवे कंपनीने हृदयाच्या ठोक्यांची मोजणी करण्यास सक्षम असणारे हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो हे दोन फिटनेस ट्रॅकर्स जाहीर केले आहेत.
वेअरेबल्य म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांमध्ये जगभरात सध्या तरी फिटनेस बँड/ट्रॅकर लोकप्रिय आहेत. या पार्श्वभूमिवर हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो हे दोन मॉडेल ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. वर नमूद केल्यानुसार यात हार्ट रेट मॉनिटर प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. अर्थात युजरच्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करून याची त्याला वेळोवेळी माहिती देण्याची सुविधा या दोन्ही मॉडेल्समध्ये प्रदान करण्यात आली आहे. तर बँड २ प्रो या मॉडेलमध्ये याबाबत विश्लेषणासह सखोल माहितीची सुविधाही असेल. या दोन्ही मॉडेलमध्ये पॅसिव्ह मॅट्रीक्स ओएलईडी म्हणजेच पीएमओएलईडी या प्रकारातील वॉटरप्रुफ डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. हे दोन्ही बँड अँड्रॉइडच्या ४.४ तर आयओएसच्या ८.० तसेच यापुढील आवृत्त्यांवर चालणार्या स्मार्टफोनशी सुलभपणे कनेक्ट करता येतात. तर हुआवे बँड २ प्रो या मॉडेलमध्ये काही अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने फर्स्टबीट ही प्रणाली असून याच्या मदतीने बँडधारकाच्या शरिरातील ऑक्सीजनच्या वापराचे अचूक मापन करता येते. अर्थात या माहितीचा स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर यामध्ये इनबिल्ट जीपीएस प्रदान करण्यात आले असून याच्या मदतीने चाललेल्या अंतराबाबतची अचूक माहिती मिळते. हे दोन्ही बँड निळा, काळा आणि लाल या तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र ते प्रत्यक्षात भारतीय ग्राहकांना केव्हा मिळणार वा त्याचे मूल्य याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.