फेसबुक, इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार; मेटाने वसुलीचा निर्णय घेतल्याचे वृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:05 IST2023-09-02T14:04:04+5:302023-09-02T14:05:50+5:30

मेटा 2019 पासून युरोपियन युनियनच्या चौकशीला सामोरे जात आहे. भारतातूनही सरकारचा दबाव वाढत आहे.

have to pay for Facebook, Insta; Reports that Meta has decided to subscription plan | फेसबुक, इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार; मेटाने वसुलीचा निर्णय घेतल्याचे वृत्त

फेसबुक, इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार; मेटाने वसुलीचा निर्णय घेतल्याचे वृत्त

जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मेटाने दोन मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना आता पैसे खर्च करावे लागणार आहेत. 

मेटाने हा निर्णय सध्यतरी युरोपपुरता घेतल्याचे वृत्त आहे. युरोपियन युनियनद्वारे जाहिराती आणि खासगीपणा यावर सातत्याने दबाव टाकला जात आहे. यामुळे मेटाने हा निर्णय घेतल्याचे वृत्तात सांगण्यात आले आहे. असाच दबाव भारतातूनदेखील घातला जात आहे. यामुळे येत्या काळात भारतात देखील मेटा फेसबुक आणि इन्स्टासाठी पैसे आकारण्याची शक्यता आहे. 

युरोपियन युनियन देशांच्या वापरकर्त्यांसाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या दोन सेवा असतील, त्यापैकी एक सशुल्क असेल आणि दुसरी विनामूल्य असेल. जे युजर फेसबुक आणि इंस्टाग्रामची सशुल्क सेवा घेतील त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत. परंतू, जे युजर फ्रीमध्ये सेवा वापरतील त्यांना जाहिराती दाखविल्या जाणार आहेत. 

मेटाने अद्याप आपल्या निर्णयावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. पेड व्हर्जनसाठी युजर्सकडून किती पैसे घेतले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही एकाच सबस्क्रीप्शनमध्ये वापरता येतील की वेगवेगळे हे देखील समजलेले नाहीय. मेटा 2019 पासून युरोपियन युनियनच्या चौकशीला सामोरे जात आहे. कंपनीवर अनेक दिवसांपासून वापरकर्त्यांचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय गोळा केल्याचा आरोप होत आहे.

Web Title: have to pay for Facebook, Insta; Reports that Meta has decided to subscription plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metaमेटा