भारीच! Instagram मध्ये WhatsApp सारखेच फिचर! मेसेज वाचल्याची माहिती मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 02:32 PM2023-11-13T14:32:41+5:302023-11-13T14:42:03+5:30

इन्स्टाग्रामवर 'रीड रिसीप्ट' लवकरच आणले जाणार आहे, हे फीचर इंस्टाग्राम वापरकर्त्यांना आलेल्या डायरेक्ट मेसेजवर काम करेल.

Heavy! Features similar to WhatsApp in Instagram! You will not get the information that the message has been read | भारीच! Instagram मध्ये WhatsApp सारखेच फिचर! मेसेज वाचल्याची माहिती मिळणार नाही

भारीच! Instagram मध्ये WhatsApp सारखेच फिचर! मेसेज वाचल्याची माहिती मिळणार नाही

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता मेटा इन्स्टाग्राममध्येही असेच एक फीचर देणार आहे, जे व्हॉट्सअॅपमध्ये आधीपासून आहे. हे फीचर समोर आल्यानंतर इंस्टाग्रामवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा इन्स्टाग्रामवरील मेसेज वाचला आहे की नाही हे कळणार नाही. 

गुगलने ऐन दिवाळीत दिला झटका! कंपनी बंद करणार खाती; जाणून घ्या तुमचं अकाऊंट आहे का?

या नव्या फिचरचे नाव 'रीड रिसीट' असं आहे. इन्स्टाग्रामवर हे फिचर लवकरच सुरू केला जाणार आहे. हे फीचर इंस्टाग्राम वापरकर्त्यांना आलेल्या डायरेक्ट मेसेजवर काम करेल. 'Read Receipt' मेसेजद्वारे, Instagram वापरकर्त्यांना पाठवलेले मेसेज कोणालाही न कळवता वाचण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपचे 'रीड रिसीप्ट' फीचर अॅक्टिव्हेट झाल्यावर मेसेज वाचूनही ब्लू टिक दिसत नाही.

इंस्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरील संदेशात या फिचरची घोषणा केली. अॅडम मोसेरी म्हणाले की, कंपनी एका नवीन फिचरची चाचणी करत आहे, यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या थेट मेसेजमध्ये  'रीड रिसिप्ट' पर्याय बंद करता येईल. जर वापरकर्त्याला संदेश वाचला आहे हे प्रेषकाला माहित आहे याची खात्री करायची असेल तर ते 'रीड रिसीप्ट' चालू करू शकतात.

मोसेरीन यांनी अॅपचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, यामध्ये हे फिचर दाखवले आहे. हा स्क्रीनशॉट दर्शवितो की इंस्टाग्राम देखील त्याचा मेनू पुन्हा डिझाइन करत आहे. त्यांनी लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. पण काही दिवसातच हे फिचर लाँच केले जाणार आहे. 

Web Title: Heavy! Features similar to WhatsApp in Instagram! You will not get the information that the message has been read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.