रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:33 IST2024-07-16T18:33:08+5:302024-07-16T18:33:50+5:30
जाणून घ्या या खास सुविधेबद्दल...

रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा
Airtel Recharge : सध्या jio आणि Airtel ने आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. पण, तुम्हाला कोणी सांगितले की, रिचार्ज न करताही तुम्ही डेटा आणि फ्री कॉलिंगचा लाभ घेऊ शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? तर मुळीच नाही. पण, आता हे शक्य आहे. तुम्ही Aritel युजर असाल, तर कंपनी तुम्हाला एक खास सुविधा देत आहे.
या सुविधेद्वारे तुम्ही फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. इमरजन्सी व्हॅलिडिटी लोन फॅसिलिटी (Airtel Emergency Validity Loan) असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे Airtel चे प्रीपेड युजर आपला चालू डेटा पॅक संपल्यावर डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळवू शकतात. यात तुम्हाला 1.5GB डेटा आणि मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो.
या सुविधेची महत्वाची बाब म्हणजे, कंपनी फक्त एक दिवसाची व्हॅलिडिटी देते. यासाठी तुमच्याकडून कुठलेही शुल्क आकारले जात आहे. ही सुविधा अशा युजर्ससाठी उपयुक्त आहे, जे पहिल्या प्लॅनची वैधता संपल्यानंतरच फोन रिचार्ज करतात. अनेक वेळा ग्राहकांकडे शेवटच्या क्षेणी रिचार्जसाठी पैसे नसतात. अशावेळी ते ग्राहक या सुविधेचा वापर करुन एक दिवस डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.