सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका

By देवेश फडके | Published: January 18, 2021 05:31 PM2021-01-18T17:31:00+5:302021-01-18T17:33:45+5:30

Hike बंद झाल्याचा फटका कोट्यवधी युझर्सना बसणार आहे. २०१२ मध्ये Hike Sticker Chat App भारतात लॉन्च करण्यात आले होते. अल्पावधीतच हे अॅप लोकप्रिय झाले होते.

hike sticker chat messaging app shut down and removed from play store | सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका

सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका

Next
ठळक मुद्दे'मेड इन इंडिया' अॅप Hike बंदकोट्यवधी युझर्सना फटका Hike ऐवजी नवीन प्रोडक्ट बाजारात आणणार

नवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी Hike Sticker Chat App युझर्ससाठी बॅड न्यूज आहे. कारण Hike अॅप आता बंद करण्यात आले आहे. Hike चे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन भारती मित्तल यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. Hike बंद झाल्याचा फटका कोट्यवधी युझर्सना बसणार आहे. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच Hike अॅप बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. Hike ऐवजी नवीन प्रोडक्ट बाजारात आणत असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. अखेर हे अॅप आता अधिकृतपणे बंद झाले आहे. एवढेच नव्हे, तर गुगल प्ले स्टोरमधूनही हे अॅप हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता हे अॅप कोणीही डाऊनलोड करू शकणार नाही. 

युझर्सचा अॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित ठिकाणी स्टोअर करण्यासाठी कंपनीने मुदत दिली आहे. तसेच काही समस्या असल्यास १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत युझर्स कंपनीशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 

Hike च्या कोट्यवधी युझर्सचे आभार मित्तल यांनी यावेळी मानले. तसेच जोपर्यंत बाहेरील देशांतील कंपन्यांवर प्रतिबंध लावला जात नाही, तोपर्यंत 'हाइक' किंवा अन्य कोणतेही भारतीय अ‍ॅप्स टेलिग्राम किंवा सिग्नलसारख्या अ‍ॅप्सशी स्पर्धा करू शकत नाही, असेही ते म्हणाले. हाइककडून Rush आणि Vibe हे दोन अॅप उपलब्ध झाले आहेत. Rush एक गेमिंग प्लॅटफॉर्म असून, यामध्ये युजर्स कॅरम आणि लूडो यांसारखे खेळू शकतात. तर, Vibe एक कम्यूनिटी प्लॅटफॉर्म आहे.

Whatsapp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराज झालेले बहुतांश युझर्स Signal आणि Telegram यांसारख्या अ‍ॅप्सकडे वळले आहेत. त्यात मेक इन इंडिया Hike कडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, हाइक अॅप बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

दरम्यान, २०१२ मध्ये Hike Sticker Chat App भारतात लॉन्च करण्यात आले होते. अल्पावधीतच हे अॅप लोकप्रिय झाले होते. कोट्यवधी युझर्सकडून Hike App डाऊनलोड करण्यात आले होते.  

Web Title: hike sticker chat messaging app shut down and removed from play store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.