जबरदस्त डिस्प्लेसह Hisense चा नवीन Smart TV भारतात सादर; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 02:47 PM2021-09-21T14:47:59+5:302021-09-21T14:48:25+5:30

4K Smart TV In India: Hisense Smart TV मध्ये Netflix, YouTube, Amazon, Google Play Movies आणि TV, आणि Amazon Prime Video असे ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्री-लोडेड मिळतात.

Hisense 55 inch 4k qled smart tv launched in india check price and features  | जबरदस्त डिस्प्लेसह Hisense चा नवीन Smart TV भारतात सादर; जाणून घ्या किंमत  

जबरदस्त डिस्प्लेसह Hisense चा नवीन Smart TV भारतात सादर; जाणून घ्या किंमत  

googlenewsNext

Hisense ने भारतात नवीन 55-इंचाचा 4K QLED Smart TV लाँच केला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमधून हा टीव्ही विकत घेता येईल. नव्या Hisense टीव्हीमध्ये Quantum Dot टेक्नॉलॉजी आणि काही प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.  

Hisense 55-inch 4K QLED Smart TV चे स्पेसिफिकेशन्स 

Hisense च्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये बेजल लेस डिजाइनसह 55-इंचाचा QLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Dolby Vision HDR, HDR10+, HDR10, HLG, Ultra Dimming ला सपोर्ट करतो. ज्याची पीक ब्राईटनेस 700 निट्स आहे. कंपनीने यात Quantum Dot टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे जी टीव्ही बघण्याचा अनुभव बदलून टाकते. या स्मार्ट टीव्हीमध्ये क्वॉड-कोर Cortex-A53 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 2GB RAM आणि 16GB इंटरनल स्टोरेज देखील मिळते. हा टीव्ही Android 10 TV ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये हाय स्पीड ग्राफिक्स प्रोसेसिंग, फाईन इमेज आणि क्लियर मोशनसाठी कंपनीचा Hi-view Engine देण्यात आला आहे.  

Hisense Smart TV मध्ये Netflix, YouTube, Amazon, Google Play Movies आणि TV, आणि Amazon Prime Video असे ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्री-लोडेड मिळतात. या टीव्हीमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट, Google Assistant, Wi-Fi (ड्युअल-बँड) आणि Bluetooth v5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीमधील 24W चे स्पिकर Dolby Atmos आणि Dolby Audio ला सपोर्ट करतात. कनेक्टिविटीसाठी Hisense TV मध्ये दोन USB Type-A पोर्ट, तीन HDMI पोर्ट, एक SPDIF पोर्ट, एक ऑडियो जॅक, RF Input, AV Input, आणि एक Ethernet पोर्ट मिळतो.  

Web Title: Hisense 55 inch 4k qled smart tv launched in india check price and features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.