Nokia फॅन्स व्हा तयार! 5050mAh Battery आणि 50MP Camera असलेला स्वस्त Nokia G21 येतोय
By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 12:36 PM2022-02-02T12:36:52+5:302022-02-02T12:37:05+5:30
Nokia G21 Smartphone Launch: Nokia G21 स्मार्टफोन ल 5050mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 4GB RAM सह सादर केला जाईल.
गेल्या महिन्यात Nokia G21 स्मार्टफोनची माहिती आली होती. आता नोकियाचा हा फोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून फोनमधील 5050mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 4GB RAM ची माहिती मिळाली आहे. Nokia G21 ला गिकबेंचच्या सिंगल कोरमध्ये 312 पॉईंट्स मिळाले आहेत. तर मल्टीकोरमध्ये 1157 पॉईंट्स मिळाले आहेत.
Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया जी21 स्मार्टफोनमध्ये 20:5 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unisoc T606 चिपसेट देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह बाजारात येईल. या फोनचा 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वेरिनेत बाजारात येऊ शकतो. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी नोकिया जी21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. यात एनएफसीसह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स मिळतील. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,050एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा:
- स्मार्टवॉचवर पैसे खर्च करण्याची गरज नाही; Realme चा स्मार्टफोनच सांगणार युजरचा हार्ट रेट
- 6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु