होम डिलिव्हरी करायला येणार रोबो !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:55 AM2021-04-28T05:55:58+5:302021-04-28T06:00:07+5:30

सिंगापूरची कंपनी असलेल्या OTSAW Digital ने घरोघरी जाऊन भाजीपाला, दूध, अंडी ह्यांचीडिलिव्हरी देणारा एक रोबोच बनवला आहे.

Home delivery robot! | होम डिलिव्हरी करायला येणार रोबो !

होम डिलिव्हरी करायला येणार रोबो !

Next

एकेकाळी आपल्या देशात फक्त दूध, वर्तमानपत्र आणि फार तर किराणा सामान यांची होम डिलिव्हरी होत असे किंवा भाजीवाला घराच्या दारापर्यंत येत असे.  बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपणही बदललो अन् होम डिलिव्हरी सेवेमार्फत आपण गरजेच्या सर्वच वस्तू मागवायला शिकलो. कोरोनाकाळात तर या सेवेला जगभरातच प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या भीतीने काही लोक ही सेवा वापरायलादेखील कचरत आहेत. त्यामुळे होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्यांनीदेखील यावर ड्रोनने घरपोहोच माल पोहोचवण्यासारख्या नव्या नव्या कल्पना लढवायला सुरुवात केली आहे. माणसाशी येणारा प्रत्यक्ष संपर्क यामुळे टाळता येतो, हा यातला प्रमुख मुद्दा !

सिंगापूरची कंपनी असलेल्या OTSAW Digital ने घरोघरी जाऊन भाजीपाला, दूध, अंडी ह्यांचीडिलिव्हरी देणारा एक रोबोच बनवला आहे. त्याला Camello असे नाव देण्यात आले आहे. एक वर्षभरासाठी याची प्रत्यक्ष चाचणी होणार असून, ह्या काळात सुमारे ७०० घरात त्याच्या मार्फत रोजच्या वापरातील वस्तू घरपोच पोचवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे एका ॲपच्या माध्यमातून प्रथम ग्राहकांना आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंचे प्री बुकिंग करावे लागेल. ऑर्डर एकदा कन्फर्म झाली की, ठरलेल्या वेळेवरती हा रोबो तुमच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अथवा तुमच्या घराजवळील विशिष्ट पिकअप पॉईंटवर सामानाची डिलिव्हरी देईल. हा रोबो निर्धारित ठिकाणावरती पोहचला की, ग्राहकांना त्यांच्या ॲपद्वारे त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होईल. 

या सर्व प्रक्रियांना नीट हाताळण्यासाठी या रोबोमध्ये हाय रेझोल्यूशन कॅमेरा, ३ डी सेंसर्स आणि सुमारे २० किलो वजन वाहून नेता येईल असे दोन कंपार्टमेंट देण्यात आले आहेत. एका दिवसात चार ते पाच डिलिव्हरी करण्यासाठी हा रोबो सक्षम आहे. शनिवारी मात्र याची सेवा
फक्त अर्धा दिवसच उपलब्ध असणार आहे. या रोबोची विशेष खासियत म्हणजे, प्रत्येक डिलिव्हरीनंतर हा रोबो स्वत:ला अल्ट्राव्हायलट लाईटच्या मदतीने संपूर्ण सॅनिटायझ करणार आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अशा पद्धतीने आरोग्याच्या पूर्ण सुरक्षेची खात्री देत आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत दिली जाणारी ही सेवा सध्या जगभरच चर्चेचा विषय बनलेली आहे. 

Web Title: Home delivery robot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.