108MP कॅमेरा, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह Honor 50 आणि Honor 50 Lite लाँच; गुगल मोबाईल सर्व्हिस सपोर्ट देखील मिळणार
By सिद्धेश जाधव | Published: October 27, 2021 03:02 PM2021-10-27T15:02:09+5:302021-10-27T15:02:16+5:30
108MP Camera Phone Honor 50 and Honor 50 Lite: Honor 50 आणि Honor 50 Lite स्मार्टफोन कंपनीने चीनच्या बाहेर युरोपमध्ये सादर केले आहेत.
Honor 50 आणि Honor 50 Lite स्मार्टफोन कंपनीने चीनच्या बाहेर सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स Honor 50 सीरिजमधील स्वस्त फोन आहेत. ज्यात 108MP कॅमेरा, 66W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट असे भन्नाट फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया Honor 50 आणि Honor 50 Lite या स्मार्टफोन्सची सविस्तर माहिती.
Honor 50 आणि Honor 50 Lite ची किंमत
Honor 50 स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 128GB व्हेरिएंट 529 यूरो (सुमारे 46,100 रुपये) आणि 8GB RAM आणि 256GB व्हेरिएंट 599 यूरो (सुमारे 52,200 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर HONOR 50 Lite स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 299 यूरो (सुमरे 26,100 रुपये) मध्ये सादर केला जाईल.
Honor 50 चे स्पेसिफिकेशन्स
Honor 50 मध्ये 6.57-इंचाचा FHD+ OLED कर्व डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 300Hz आहे. या ऑनरच्या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G 5G SoC सह Adreno 642L GPU आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या RAM, आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये Android 11 आधारित Magic UI 4.2 देण्यात आला आहे.
Honor 50 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे 108MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 32MP चा सिंगल फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे, जी 66W सुपरचार्जर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Honor 50 Lite चे स्पेसिफिकेशन्स
Honor 50 Lite स्मार्टफोनमध्ये 6.67 -इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Snapdragon 662 SoC दिला आहे. या 6GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. Android 11 वर आधारित हा फोन Magic UI 4.2 वर चालतो.
Honor 50 Lite मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा मुख्य कॅमेरा 64MP चा आहे. या मुख्य कॅमेऱ्याला 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. ऑनरचा हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. साइड माउंडेट फिंगरप्रिंट सेन्सर असेलल्या या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे, जी 66W SuperCharge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.