120Hz डिस्प्ले, 108MP कॅमेऱ्यासह लाँच झाली Honor 50 सीरिज; जाणून घ्या या दमदार फोन्सची किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2021 04:02 PM2021-06-17T16:02:25+5:302021-06-17T16:38:54+5:30

Honor 50 Pro Honor 50 launch: Honor 50 सीरिजमधील हे दोन दमदार फोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, यांची किंमत 31,000 रुपयांपासून सुरु होत आहे.

Honor 50 pro honor 50 launched with 108 megapixel rear cameras 120hz displays   | 120Hz डिस्प्ले, 108MP कॅमेऱ्यासह लाँच झाली Honor 50 सीरिज; जाणून घ्या या दमदार फोन्सची किंमत  

Honor 50 Pro मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP चा डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.

Next

Honor 50 series सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजअंतगर्त Honor 50, Honor 50 Pro आणि Honor 50 SE असे तीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. विशेष म्हणजे हे फोन गुगलच्या Google Mobile Services सपोर्टसह सादर करण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्ही गुगल प्ले स्टोर, जीमेल, युट्युब इत्यादी गुगलच्या सेवा सहज वापरू शकता. चला जाणून घेऊया यातील Honor 50 आणि Honor 50 Pro ची माहिती.  

Honor 50 आणि Honor 50 Pro ची किंमत 

Honor 50 स्मार्टफोन कंपनीने तीन मॉडेलमध्ये सादर केला आहे. या फोनचा 8GB/128GB मॉडेल 2,699 RMB (अंदाजे 30,900 रुपये) आणि 8GB/256GB मॉडेल 2,999 RMB (अंदाजे 34,700 रुपये) आणि 12GB/256GB मॉडेल 3,399 RMB (अंदाजे 39,000 रुपये) मध्ये लाँच केला गेला आहे.  

Honor 50 Pro स्मार्टफोन दोन मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा मोठा व्हेरिएंट 8GB/ 256GB सह येतो आणि याची किंमत 3,699 RMB (अंदाजे 42,400 रुपये) आहे. तर, 12GB/256GB व्हेरिएंट 3,999 RMB (अंदाजे 45,900 रुपये) मध्ये विकत घेता येईल. Honor 50 आणि Honor 50 Pro स्मार्टफोन चीनमध्ये प्रीऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. यांची विक्री 25 जूनपासून सुरु होईल. 

Honor 50 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Honor 50 Pro मध्ये 6.72-इंचाचा FHD+ OLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 300Hz आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G 5G SoC सह Adreno 642L GPU, 12GB पर्यंत RAM, आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. Android 11 वर आधारित Magic UI 4.2 सह चालणाऱ्या या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जसह देण्यात आली आहे.  

Honor 50 Pro मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP चा डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 32MP प्राइमरी फ्रंट कॅमेऱ्यासह 12MP अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Honor 50 चे स्पेसिफिकेशन्स 

Honor 50 मध्ये 6.57-इंचाचा FHD+ OLED कर्व डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 300Hz आहे. या ऑनरच्या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G 5G SoC सह Adreno 642L GPU आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या RAM, आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये Android 11 आधारित Magic UI 4.2 देण्यात आला आहे. 

Honor 50 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे 108MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 32MP चा सिंगल फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे, जी 66W सुपरचार्जर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. 

Web Title: Honor 50 pro honor 50 launched with 108 megapixel rear cameras 120hz displays  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.