108MP कॅमेरा आणि 12GB RAM सह दोन धमाकेदार फोन आले बाजारात; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: December 2, 2021 12:48 PM2021-12-02T12:48:44+5:302021-12-02T12:49:00+5:30
HONOR 60 आणि HONOR 60 Pro हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही डिवाइसेसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 66W फास्ट-चार्जिंग आणि 108MP Camera असे जबरदस्त स्पेक्स मिळतात.
HONOR आता स्वतंत्र कंपनी आहे आणि त्यामुळे कंपनी एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं आपली Honor X30 लाईनअप सादर केली होती. तर आता HONOR 60 आणि HONOR 60 Pro हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही डिवाइसेसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 66W फास्ट-चार्जिंग आणि 108MP Camera असे जबरदस्त स्पेक्स मिळतात.
HONOR 60 चे स्पेसिफिकेशन्स
HONOR 60 मध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट आणि एड्रेनो 642L GPU च्या प्रोसेसिंग पॉवरसह बाजारात आला आहे. सोबत 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे. हा 5जी फोन बेसिक कनेक्टिव्हिटी आणि इन डिप्सले फिंगरप्रिंट सेन्सरसह आला आहे.
हा फोन Android 11 वर आधारित मॅजिकयुआय 5.0 वर चालतो. फोटोग्राफीसाठी HONOR 60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनमध्ये 32MP चा शानदार सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 4,800mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
HONOR 60 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
HONOR 60 Pro 5G मध्ये मोठा 6.78-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G + चिपसेट देण्यात आला आहे. सोबत कंपनीनं एड्रेनो 642L GPU दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड मॅजिकयुआय 5.0 वर चालतो.
कॅमेरा सेगमेंट पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. जो 108MP चा प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. Honor 60 Pro 5G मध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या 5G फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या डिवाइसमध्ये 66W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 4,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
HONOR 60 आणि 60 Pro ची किंमत
- HONOR 60 8GB/128GB: 2,699 युआन (जवळपास 31,800 रुपये)
- HONOR 60 8GB/256GB: 2,999 युआन (जवळपास 35,300 रुपये)
- HONOR 60 12GB/256GB: 3,299 युआन (जवळपास 38,800 रुपये)
- HONOR 60 Pro 8GB/256GB: 3,699 युआन (जवळपास 43,500 रुपये)
- HONOR 60 Pro 12GB/256GB: 3,999 युआन (जवळपास 47,100 रुपये)