अरे वा! 50MP चा शानदार सेल्फी कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग; ‘या’ कंपनीचे तीन जबरदस्त स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: May 31, 2022 09:32 AM2022-05-31T09:32:09+5:302022-05-31T09:32:16+5:30
ऑनरनं आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये तीन नव्या स्मार्टफोन्सची भर टाकली आहे.
Honor नं आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये Honor 70, Honor 70 Pro आणि Honor 70 Pro Plus या तीन हँडसेटची भर टाकली आहे. या फोन्समध्ये 12GB पर्यंत RAM, 54MP कॅमेरा, 50MP सेल्फी कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग आणि दमदार बॅटरी असेल जबरदस्त स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चीनमध्ये आलेल्या या डिवाइसची किंमत 3699 युआन (सुमारे 43,000 रुपये) पासून सुरु होते.
ऑनर 70 प्रो आणि प्रो प्लसचे स्पेसिफिकेशन
या फोन्समध्ये 6.78 इंचाचा कर्व डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. प्रो मॉडेल फुल एचडी+ तर प्रो प्लस QHD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हे फोन्स अँड्रॉइड 12 आधारित Magic UI 6.1 वर चालतात. स्मार्टफोन्समध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळते. ऑनर 70 प्रो मध्ये डायमेन्सिटी 8000 चिपसेट देण्यात आला आहे. तर प्रो प्लस व्हेरिएंट डायमेन्सिटी 9000 चिपसेटसह येतो.
फोटोग्राफीसाठी या फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 54 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, सोबत 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी कंपनीनं 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यातील 4600mAh ची बॅटरी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ऑनर 70 चे स्पेसिफिकेशन्स
ऑनर 70 या सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे, ज्याची किंमत 2699 युआन (31,400 रुपये) पासून सुरु होते. यात कंपनीनं फुल एचडी+ रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा OLED कर्व डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन देखील अँड्रॉइड 12 आधारित Magic UI 6.1 वर चालतो यात स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसरसह 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 54 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमधील 4800mAh ची बॅटरी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.