पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स

By शेखर पाटील | Published: November 8, 2017 08:47 AM2017-11-08T08:47:39+5:302017-11-08T08:47:51+5:30

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने भारतात पुढील महिन्यात आपला ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन सादर करण्याचे जाहीर केले आहे.

Honor 7X coming next month | पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स

पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स

Next

ऑनर कंपनीचे सीईओ जॉर्ज झाओ यांनी एका भारतीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डिसेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत ऑनर ७ एक्स हे मॉडेल सादर करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सध्या ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन चिनी बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. यात ५.९३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचे कडा विरहीत म्हणजेच बेझेल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल. यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून ऑनर स्मार्टफोनमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

भारतीय चलनानुसार ऑनर ७ एक्स या स्मार्टफोनचे चीनमधील मूल्य सुमारे २० हजार रूपये आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन यापेक्षा कमी मूल्यात सादर करण्यात येईल अशी माहिती खुद्द जॉर्ज झाओ यांनी याप्रसंगी दिली. भारतीय बाजारपेठेत मूल्य हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सध्या ४ जीबी रॅम असणारे काही स्मार्टफोन १० ते १५ हजार रूपयांच्या दरम्यान उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे झाओ यांनी जर या अथवा यापेक्षा कमी मूल्यात जर ऑनर ७ एक्स मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले तर या माध्यमातून अन्य मॉडेल्सला चांगले आव्हान उभे राहू शकते.

Web Title: Honor 7X coming next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.