Honor 8X स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत 14,999 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 04:09 PM2018-10-16T16:09:56+5:302018-10-16T16:14:50+5:30
Huawei कंपनीचा उप ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला आहे. Honor 8X हा स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे.
मुंबई : Huawei कंपनीचा उप ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला आहे. Honor 8X हा स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने तीन व्हेरियंटमध्ये Honor 8X स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनची किंमत व्हेरियंटनुसार आहे. सुरुवातीची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.
Honor 8X स्मार्टफोन सुरुवातीला अॅमेझॉन इंडिया वेबसाइटवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यानंतर या स्मार्टफोनची अधिकृत विक्री मार्केटमध्ये 24 ऑक्टोबरपासून होणार आहे. स्मार्टफोनच्या पाठीमागे प्रिमियम ग्लास फिनिशिंग देण्यात आले आहे. तर फ्रंटला नॉच डिस्प्ले आहे. तसेच, हा स्मार्टफोन ओरिओ बेस्ड EMUI 8.2.0 सिस्टिमवर आधारित आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. या प्रायमरी कॅमेरा 20 मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल देण्यात आला आहे. तर फ्रंट सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचा अपर्चर f/2.0 आहे.
खास फोटोग्राफीसाठी AI बेस्ड फीचर्स दिले आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये पॉवर सेविंगच्या फीचरसहित 3,750mAh बॅटरी दिली आहे. याचबरोबर, ब्लॅक, रेड आणि ब्लू कलरमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे.