भारतात लाँच झाला Honor Band 6; यात आहे SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचर 

By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2021 04:36 PM2021-06-09T16:36:47+5:302021-06-09T16:48:06+5:30

Honor Band 6 launch: Honor Band 6 हा फिटनेस ट्रॅकर SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचरसह येतो. डिवाइस ऑप्टिकल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने अचूकपणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सांगू शकतो. 

Honor Band 6 with SpO2 blood monitoring launched in India  | भारतात लाँच झाला Honor Band 6; यात आहे SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचर 

भारतात लाँच झाला Honor Band 6; यात आहे SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचर 

Next

चिनी कंपनी Honor आपला नवीन स्मार्ट बँड भारतात लाँच केला आहे. हा बँड Honor Band 6 या नावाने सादर करण्यात आला आहे. हा बँड 14 जूनपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. या बँडची खासियत म्हणजे हा 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. (Honor Band 6 launched in india on Flipkart)  

Honor Band 6 हा फिटनेस ट्रॅकर SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचरसह येतो. डिवाइस ऑप्टिकल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने अचूकपणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सांगू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. Honor Band 6 3,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्टने अनेक ऑफर सादर केल्या आहेत.  

Honor Band 6 चे स्पेसिफिकेशन्स  

Honor Band 6 मध्ये 1.43-इंचाची अ‍ॅमोलेड स्क्रीन असेल. या स्क्रीनचे रिजोल्यूशन 194 x 368 पिक्सेल असेल. हा डिस्प्ले 2.5D कर्व ग्लासच्या सुरक्षेसह येईल. या फिटनेस ट्रॅकरच्या बाजूला असलेले बटन नेव्हिगेशनसाठी वापरता येईल. या बँडचे वजन फक्त 18 ग्राम आहे. घरात आणि घराबाहेर धावणे, चालणे, सायकल चालवणे आणि इतर 10 व्यायामाचे प्रकार हा ट्रॅकर ट्रॅक करू शकतो. यात अक्सेलेरोमीटर आणि जायरोस्कोप असे सेन्सर आहेत. या बँडमध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर सेन्सर, TruSeen 4.0 हार्ट रेट मॉनिटरिंग, TruSleep 2.0 स्लिप ट्रॅकिंग आणि TruRelax स्ट्रेस ट्रॅकिंग असे फीचर्स मिळतात. हा बँड तुम्ही व्यायाम करत आहात कि नाही हे देखील सांगू शकतो.   

Web Title: Honor Band 6 with SpO2 blood monitoring launched in India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.