512GB स्टोरेजसह आला जगातील सर्वात ‘पातळ' Foldable Phone; सॅमसंग-शाओमी नाही तर या कंपनीनं केली कमाल
By सिद्धेश जाधव | Published: January 11, 2022 01:25 PM2022-01-11T13:25:42+5:302022-01-11T13:25:53+5:30
Honor Magic V: Honor नं आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Honor Magic V चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोल्डेबल फोन 12GB RAM, 512GB Storage आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
Honor नं Foldable Smartphone सेगमेंटमध्ये पदार्पण केलं आहे. कंपनीनं चीनमध्ये Honor Magic V लाँच केला आहे. या फोनची डिजाईन जरी Samsung Galaxy Z Fold सारखी असली तरी हा जगातील सर्वात पातळ (स्लिम) स्मार्टफोन आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. Honor Magic V फोल्डेबल स्मार्टफोन चीनमध्ये 18 जानेवारीपासून खरेदी करता येईल. तिथे या फोनची किंमत 9999 युआन (जवळपास 1.16 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे.
Honor Magic V
Honor Magic V मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. फोल्ड केल्यानंतर या फोनची जाडी 14.3mm आहे तर अनफोल्ड केल्यावर 6.7mm जाडी आहे. Honor च्या या 7.9 इंचाचा मुख्य डिस्प्ले आतल्या बाजूस आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 6.9 इंचाचा सेकंडरी OLED डिस्प्ले बाहेरच्या बाजूला देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
Honor Magic V फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. सोबत 50MP चा वाईड अँगल आणि 50MP चा स्पेक्ट्रम सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी 42MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. Honor Magic V मध्ये 4,750mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोल्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोन पॉवरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर चालतो. यात 12GB RAM सह 256GB आणि 512GB स्टोरेजचे दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. यात Android 12 आधारित Honor Magic UI 6.0 मिळतो.
हे देखील वाचा:
108MP कॅमेरा असलेला पॉवरफुल Xiaomi 11T Pro 5G Phone यादिवशी येणार भारतात; किंमतही समजली
28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर