स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स

By सिद्धेश जाधव | Published: April 6, 2022 05:15 PM2022-04-06T17:15:19+5:302022-04-06T17:16:02+5:30

Honor नं भारतात दोन लॅपटॉप मॉडेल सादर केले आहेत. ज्यांनी MagicBook X 14 आणि MagicBook X 15 नावानं एंट्री घेतील आहे.  

Honor Magicbook X14 Honor Magicbook X15 Laptop Launched In India Price And Specifications   | स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स

स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स

Next

Honor MagicBook X 14 आणि MagicBook X 15 असे दोन लॅपटॉप भारतात लाँच झाले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप विंडोज 10 सह देशात आले आहेत आणि लवकरच यांना Window 11 चा अपडेट मिळेल. कंपनीनं यात 10th-gen Intel Core प्रोसेसरचा वापर केला आहे.  

Honor MagicBook X 14 चे स्पेसिफिकेशन्स 

Honor MagicBook X 14 मध्ये 14-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस अँटी-ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला TUV Rheinland लो ब्लु लाईट आणि फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन मिळालं आहे. यात एक बॅकलिट कीबोर्ड आणि पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. लॅपटॉपमधील पॉप-अप वेबकॅम 720p HD रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.  

या लॅपटॉपमध्ये Intel Core i5-10210U पर्यंतचा प्रोसेसर, Intel UHD ग्राफिक्स, 8GB पर्यंत DDR4 RAM आणि 512GB PCIe SSD स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये 56Wh ची बॅटरी आहे, जी 13.2 तासांचा बॅकअप देते. MagicBook X 14 सोबत 65W फास्ट चार्जर मिळतो.  

Honor MagicBook X 15 चे स्पेसिफिकेशन्स 

Honor MagicBook X 15 मध्ये 15.6-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस अँटी-ग्लेयर डिस्प्ले आहे. यात एक बॅकलिट कीबोर्ड आणि पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. लॅपटॉपमधील पॉप-अप वेबकॅम HD रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.कंपनीनं यात Intel Core i3-10110U प्रोसेसरसोबत Intel UHD ग्राफिक्स, 8GB DDR4 RAM आणि 256GB PCIe SSD स्टोरेज दिली आहे. या लॅपटॉपमधील 42Wh ची बॅटरी 7.8 तास चालते आणि 65W फास्ट चार्जरनं चार्ज करता येते.  

किंमत 

Honor MagicBook X 14 चा Intel Core i3 प्रोसेसर असलेला मॉडेल 42,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर Intel Core i5 प्रोसेसरसाठी 51,990 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. Honor MagicBook X 15 ची किंमत 40,990 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत 12 एप्रिलपर्यंत 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हे लॅपटॉप अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येतील. तसेच यांची खरेदी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं केल्यास 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. 

 

Web Title: Honor Magicbook X14 Honor Magicbook X15 Laptop Launched In India Price And Specifications  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.