Budget 5G Phone: फक्त 13 हजारांमध्ये आला आकर्षक 5G Phone; फक्त डिजाईन नाही तर फीचर्सही प्रीमियम
By सिद्धेश जाधव | Published: December 16, 2021 06:07 PM2021-12-16T18:07:49+5:302021-12-16T18:08:40+5:30
Budget 5G Phone: HONOR Play 30 Plus 5G चीनमध्ये 8GB RAM, मीडियाटेकचा चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला गेला आहे.
Budget 5G Phone: ऑनरनं HONOR Play 30 Plus सादर केला आहे. फोनची डिजाईन प्रीमियम फील देते. परंतु किंमत मात्र एंट्री लेव्हल 5G Phone इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 8GB RAM, मीडियाटेकचा चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh ची बॅटरी असे भन्नाट फीचर्स देखील देण्यात आले आहेत. पुढे आम्ही HONOR Play 30 Plus 5G फोनच्या किंमतीची माहिती दिली आहे.
HONOR Play 30 Plus 5G चे स्पेसिफिकेशन्स
HONOR Play 30 Plus 5G स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Android 11 आधारित Magic UI 5.0 वर चालतो. या फोनला MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.
HONOR Play 30 Plus 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी ऑनर फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
HONOR Play 30 Plus 5G ची किंमत
- 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट: 1,099 युआन (सुमारे 13,100 रुपये)
- 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट: 1,299 युआन (सुमारे 15,500 रुपये)
- 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट: 1,499 युआन (सुमारे 17,900 रुपये)