10GB RAM, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह HONOR चा शानदार 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 03:55 PM2021-10-26T15:55:36+5:302021-10-26T15:55:49+5:30
New 5G Phone Honor Play 5 Vitality Edition Launch Price: Honor Play 5 Vitality Edition चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर झाले आहेत. हा फोन 8GB RAM आणि 2GB व्हर्च्युअल RAM ला सपोर्ट करतो.
गेल्याच आठवड्यात Honor ने आंतरराष्ट्रीय बाजारात Honor 50 हा आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीने मिडरेंजमध्ये 5G Phone उतरवला आहे. कंपनीने चीनमध्ये Honor Play5 Youth Edition सादर केला आहे. हा फोन Honor Play 5 Vitality Edition ने देखील ओळखला जाईल. हा फोन मे महिन्यात आलेल्या Honor Play 5 चा नवीन व्हर्जन आहे.
Honor Play 5 Vitality Edition चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन मीडियाटेक डिमेंसीटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8GB RAM आणि 2GB व्हर्च्युअल RAM ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित मॅजिक युआय 4.2 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या 5G फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटीसह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या मोबाईलमध्ये 4300mAh ची बॅटरी 66W सुपरचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.
Honor Play 5 Vitality Edition ची किंमत
Honor Play 5 Vitality Edition च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1799 युआन (सुमारे 21,000 रुपये) आहे. तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (सुमारे 23,500 रुपये) आहे. हा फोन सध्या चीनमध्ये उपलब्ध झाला आहे, जागतिक बाजारातील उपलब्धतेची माहिती कंपनीने दिली नाही.