64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2021 03:32 PM2021-06-30T15:32:14+5:302021-06-30T15:32:48+5:30
Honor X20 SE launch: Honor ने चीनमध्ये Honor X20 SE स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला आहे.
Honor ने चीनमध्ये Honor X20 SE स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे आणि 9 जुलैपासून याची विक्री सुरु होईल. Honor X20 SE मध्ये कंपनीने मीडियाटेक Dimensity 700 चिपसेट दिला आहे. हा फोन 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 4000mAh बॅटरी आणि 22.5W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
Honor X20 SE स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Honor X20 SE मध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. या ऑनर स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेटला 8GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Magic UI 4.0 वर चालतो.
Honor X20 SE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमधील 4,000mAh ची बॅटरी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Honor X20 SE ची किंमत
Honor X20 SE स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा छोटा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1,799 यूआन (अंदाजे 20,700 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल 1,999 युआन (अंदाजे 23,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.