Budget 5G Phone: 12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी 

By सिद्धेश जाधव | Published: December 17, 2021 11:44 AM2021-12-17T11:44:37+5:302021-12-17T11:45:01+5:30

Budget 5G Phone: Honor X30 5G स्मार्टफोन देखील प्रीमियम मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 12GB RAM, 48MP Camera, 66W फास्ट चार्जिंग आणि Qualcomm Snapdragon 695 चिपसेट देण्यात आला आहे.  

Honor x30 5g phone launched with snapdragon 695 chipset 48mp triple rear camera  | Budget 5G Phone: 12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी 

Budget 5G Phone: 12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी 

googlenewsNext

Budget 5G Phone: Honor नं चीनमध्ये दोन 5G Phones सादर केले आहेत. यातील Honor Play 30 Plus 5G ची किंमत 13,000 भारतीय रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. तर Honor X30 5G स्मार्टफोन देखील प्रीमियम मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 12GB RAM, 48MP Camera, 66W फास्ट चार्जिंग आणि Qualcomm Snapdragon 695 चिपसेट देण्यात आला आहे.  

Honor X30 5G ची किंमत 

Honor X30 स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1499 युआन (सुमारे 17,900 रुपये) आहे. तर 12GB रॅम 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 2299 युआन (सुमारे 27,500 रुपये) मोजावे लागतील. हा स्मार्टफोन ब्लॅक, सिल्वर, गोल्ड आणि ब्लू अशा चार रंगात विकत घेता येईल. हा स्मार्टफोन भारतासह जगभरात कधी उपलब्ध होईल, याची माहिती मात्र मिळाली नाही.  

Honor X30 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Honor X30 5G स्मार्टफोन Android 11 आधारित Magic UI 5.0 वर चालतो. यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. पॉवर बॅकअपची जबाबदारी या फोनमधील 4,800mAh ची बॅटरी पार पाडते. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Honor X30 5G मध्ये 6.8-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो FHD+ (1080 x 2388पिक्सल) रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. Honor X30 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रिंग डिजाइनसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात LED फ्लॅश, 48MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं यात 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.  

Web Title: Honor x30 5g phone launched with snapdragon 695 chipset 48mp triple rear camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.