फिंगरप्रिंटने लॉक-अनलॉक होणार Whatsapp; कसं ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:05 PM2019-09-16T12:05:48+5:302019-09-16T12:07:44+5:30
युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉट्सअॅप देखील सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने जगभरात कोट्यावधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉट्सअॅप देखील सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. कंपनीने आपल्या युजर्ससाठी 'Fingerprint Lock Feature' आणलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअॅप लॉक अथवा अनलॉक करू शकतात. काही दिवसांपूर्वी WABetaInfo ने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती.
व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये ही नवीन फिंगरप्रिंट लॉकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन युजर्सना 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होणार. यानंतर युजर्स आपले फिंगरप्रिंट येथे रजिस्टर करू शकणार आहेत.
अँड्रॉईड बीटापूर्वी व्हॉट्सअॅपने हे फिचर्स आयओएसला उपलब्ध करुन दिले आहे. त्याचप्रमाणे तीन महिन्यानंतर आयओएस युजर्सना व्हॉट्सअॅप सुरक्षितेसाठी फेस आयडी व टच आयडीची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तसेच व्हॉट्सअॅपचे कोणतेही नवीन फीचर्स येणार असेल तर ते सर्वात प्रथम अँड्रॉइड युजर्सला उपलब्ध केलं जातं. त्यानंतर आयओएस युजर्सला ते फीचर दिलं जातं.
अँड्रॉईड फोनवर फिंगरप्रिंट असं करा अॅक्टिवेट
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करून अकाऊंट सेटिंगमध्ये जा.
- सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करून त्याखाली देण्यात आलेल्या. फिंगरप्रिट लॉकवर जा.
- फिंगरप्रिंट लॉकवर क्लिक केल्यास युजर्सच्या फोनमध्ये हे फीचर अॅक्टिवेट होईल.
- आपलं व्हॉट्सअॅप किती वेळात लॉक झालं पाहिजे हे देखील युजर्स यामध्ये ठरवू शकतात.
- यासाठी त्वरीत, 1 मिनिट किंवा 30 मिनिटं असे तीन पर्याय युजर्सना देण्यात आले आहेत.
आयफोनवर फिंगरप्रिंट असं करा अॅक्टिवेट
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅपच्या अकाऊंट सेटिंगमध्ये जा.
- सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करा.
- खाली देण्यात आलेल्या ऑन-ऑफ टॉगलसोबत स्क्रीन लॉकचा पर्याय मिळेल. टॉगल ऑन करा.
- युजर्सचा आयफोन टच आयडी सपोर्ट करत असेल तर फिंगरप्रिंट लॉक फीचर अॅक्टिवेट होईल.
Whatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज
Whatsappच्या 'या' नवीन फीचरमध्ये येणार फिंगरप्रिंट लॉक
व्हॉट्सअॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअॅप बीटामध्ये फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करू शकणार आहे.