Google : मस्तच! भूकंप येण्याअगोदर मोबाईलर मिळणार अलर्ट!Google'ची 'ही' सेवा वाचवणार तुमचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:59 PM2023-03-22T13:59:17+5:302023-03-22T14:00:06+5:30

Earthquake Alerts System: काल मंगळवारी अफगाणिस्तान, पाकिस्तानसह भारतात भूकंपाचे धक्के बसले.

how android earthquake alerts system works pakistani users got alert twitter | Google : मस्तच! भूकंप येण्याअगोदर मोबाईलर मिळणार अलर्ट!Google'ची 'ही' सेवा वाचवणार तुमचा जीव

Google : मस्तच! भूकंप येण्याअगोदर मोबाईलर मिळणार अलर्ट!Google'ची 'ही' सेवा वाचवणार तुमचा जीव

googlenewsNext

Earthquake Alerts System: काल मंगळवारी अफगाणिस्तान, पाकिस्तानसह भारतात भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली-एनसीआरसह भारताच्या विविध भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जगभरात लाखो लोक अशा भागात राहतात जिथे भूकंप होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत इशारा देणारी यंत्रणा जीव वाचवण्यास मदत करू शकते. आपला मोबाईल आपल्याला भूकंप येण्याअगोदर इशारा देऊ शकतो.

अमेरिकन टेक कंपनी Google वापरकर्त्यांना वेळेत भूकंपाचे अलर्ट पाठवते. भूकंपाच्या काही सेकंद आधी अँड्रॉइड यूजर्संना त्यांच्या फोनवर हा अलर्ट मिळतो. याद्वारे वापरकर्ते त्यांचे आणि इतरांचे प्राण वाचवू शकतात. पण ही सेवा तुम्हाला अगोदर सुरू करावी लागते.

या गुगल सेवेचे नाव अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टम आहे. ही एक पूर्णपणे मोफत सेवा आहे जी जगभरात येणारे भूकंप ओळखते. भूकंपाच्या आधी ही सेवा अँड्रॉइड यूजर्सना अलर्ट पाठवते. पाकिस्तानमध्येही अनेकांना फोनवर भूकंपाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचे स्क्रीनशॉटही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भूकंपाचे धक्के शोधण्यासाठी शेक अलर्ट १,६७५ सिस्मिक सेन्सर्सचे नेटवर्क वापरते. यानंतर डेटाचे विश्लेषण केले जाते आणि भूकंपाचे ठिकाण आणि प्रभाव ओळखला जातो. लोकांना भूकंपाची तयारी करता यावी यासाठी ही प्रणाली थेट अँड्रॉइड फोनवर अलर्ट पाठवते.

दोन प्रकारच्या सूचना मिळतात

अँड्रॉइड फोनसाठी भूकंप सूचना दोन प्रकारे तयार करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारच्या अलर्ट सूचना फक्त ४.५ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांसाठी पाठवल्या जातात. पहिल्या अलर्टचे नाव 'बी अवेअर अलर्ट' आहे, तर दुसऱ्या चे नाव 'टेक अॅक्शन अलर्ट' आहे.
 

Web Title: how android earthquake alerts system works pakistani users got alert twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.