Ration Card : नवीन रेशन कार्ड काढायचंय?, 'ही' कागदपत्र आहेत आवश्यक; जाणून घ्या, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:01 PM2021-03-25T15:01:28+5:302021-03-25T15:21:19+5:30

Ration Card : रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते.

how to apply for ration card online and offline eligibility and required documents one nation one ration card | Ration Card : नवीन रेशन कार्ड काढायचंय?, 'ही' कागदपत्र आहेत आवश्यक; जाणून घ्या, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

Ration Card : नवीन रेशन कार्ड काढायचंय?, 'ही' कागदपत्र आहेत आवश्यक; जाणून घ्या, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

googlenewsNext

नवी दिल्ली - रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापरही केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही मान्य केले जाते. परंतु मात्र रेशन कार्ड प्रत्येकजण तयार करू शकत नाही. हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे.

भारताचे नागरिकत्व असणारा देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील मुलांचं नाव हे पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाते. तर दुसरीकडे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.

रेशन कार्डसाठी 'ही' कागदपत्र आवश्यक

- मतदान कार्ड / मतदार ओळखपत्र

- आधार कार्ड

- अ‍ॅड्रेस प्रूफ

- कुटूंबाच्या प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो (2 पासपोर्ट साईज फोटो)

- वीज / पाण्याचे बिल / टेलिफोन बिल (कोणतेही एक)

-  भारत सरकारने जारी केलेले कोणतेही दस्तऐवज

जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

-  राज्य सरकारकडून रेशन कार्ड दिले जाते. म्हणूनच रेशनकार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी आहे. 

- रेशन कार्डसाठी ऑफलाईन अर्ज करता येतो तर काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे.

-  सर्व आवश्यक माहिती भरा आणि आपल्या क्षेत्रातील रेशन डीलरला किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडे द्या.

-  अर्जासाठी या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांशी तहसीलमध्ये संपर्क साधता येईल.

- अर्जदार रेशन कार्डसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येही देखील अर्ज करू शकतो.

-  रेशन कार्ड फॉर्म सबमिट केल्यानंतर, स्लिप घ्यायला विसरू नका.

- रेशन कार्डसाठी अर्ज फी 5 ते 45 रुपयांपर्यंत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्वसामान्यांसाठी खूशखबर! रेशन कार्ड धारकांसाठी Mera Ration App लाँच; एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

सर्वसामान्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात Mera Ration नावाचं Mobile App लाँच केलं आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना Fair Price Shop सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. Mera Ration mobile app हे Androd Smartphones साठी लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते.

Web Title: how to apply for ration card online and offline eligibility and required documents one nation one ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.