आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त 

By सिद्धेश जाधव | Published: August 9, 2021 07:45 PM2021-08-09T19:45:45+5:302021-08-09T19:46:20+5:30

Blocking UPI Account: जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही विविध युपीआय वॉलेट्सच्या हेल्पलाईन नंबर्सवर कॉल करून तुमचं अकॉउंट ब्लॉक करू शकता.  

How to block paytm phone pe and google pay account when your phone is stolen or missing  | आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त 

आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त 

googlenewsNext

सध्या भारतात डिजिटल देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी भारतीय गुगल पे, पेटीएम आणि फोन पे इत्यादी युपीआय आधारित अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. तसे पाहता हे खूप उपयुक्त अ‍ॅप्स आहेत, परंतु चुकीच्या लोकांच्या हातात तुमचा फोन गेल्यास हे महागात पडू शकतात. परंतु यावर देखील उपाय आहे, जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही Paytm, Google Pay आणि PhonePe ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.  

PhonePe अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी   

  • PhonePe युजर्स 08068727374 किंवा 02268727374 नंबरवर कॉल करू शकतात.  
  • भाषा निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या PhonePe अकॉउंटमधील प्रॉब्लम रिपोर्ट करू शकता.  
  • यासाठी योग्य त्या ऑप्शनची निवड करा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
  • त्यावर एक OTP येईल तो मिळाला नाही हे सांगणारा पर्याय निवडा.  
  • त्यानंतर फोन किंवा सिम हरवल्याचा पर्याय निवडा.   
  • त्यानतंर एक प्रतिनिधीशी तुमचा कॉल जोडला जाईल. तुम्हाला फोन पे प्रतिनिधीला फोन नंबर, ईमेल, लास्ट पेमेंट इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमचं अकॉउंट ब्लॉक करण्यात येईल.   

Paytm अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी  

  • फोन हरवल्यास तुमचा पेटीएम अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम Paytm Payments Bank हेल्प लाइन नंबर 01204456456 वर कॉल करा. 
  • आता फोन हरवल्याचा पर्याय निवडा.  
  • त्यानंतर वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि हरवलेल्या फोनचा नंबर एंटर करा. 
  • त्यानंतर सर्व डिवाइसमधून लॉग आउट करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा. 
  • त्यांनतर Paytm वेबसाइटवर जाऊन 24×7 हेल्प ऑप्शनची निवड करा. 
  • Report a Fraud सिलेक्ट करून कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा. 
  • आता Any Issue वर क्लिक करून सर्वात खाली दिलेल्या Message Us बटणवर क्लिक करा. 
  • तुम्हाला ट्रांजेक्शन किंवा एखादा ईमेल, डेबिट कार्ड स्टेटमेंट अकॉउंटचे मालक म्हणून पुराव्यासाठी पाठवावी लागले.  
  • त्यानंतर Paytm तुमचे अकॉउंट ब्लॉक करेल आणि तुम्हाला मेसेज पाठवला जाईल. 

Google Pay अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी  

  • Google Pay युजर्स असाल तर 18004190157 वर कॉल करून तुमची भाषा निवडा. 
  • त्यानंतर इतर समस्या हा पर्याय निवडा. त्यानंतर तज्ज्ञांशी बोलण्याचा पर्याय निवडा, जे तुमचं Google Pay अकॉउंट ब्लॉक करण्यास मदत करतील.  
  • तसेच अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स दुसऱ्या डिवाइसवरून हरवलेल्या डिवाइसवरील डेटा डिलीट करू शकतात. यामुळे फक्त पेमेंट अ‍ॅप्स नव्हे तर इतर कोणतेही अ‍ॅप्स आणि त्यांचा डेटा इतर कुणालाही वापरता येणार नाही.  

Web Title: How to block paytm phone pe and google pay account when your phone is stolen or missing 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.