आता WhatsApp वरून बुक करा Covid Vaccine Slot, जाणून घ्या पद्धत 

By सिद्धेश जाधव | Published: August 24, 2021 06:42 PM2021-08-24T18:42:31+5:302021-08-24T18:42:40+5:30

Covid Vaccine Slot On Whatsapp: WhatsApp वरील MyGov Corona Helpdesk चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही COVID-19 वॅक्सीन स्लॉट देखील बुक करू शकता. 

How to book covid vaccine slot using whatsapp step by step process  | आता WhatsApp वरून बुक करा Covid Vaccine Slot, जाणून घ्या पद्धत 

आता WhatsApp वरून बुक करा Covid Vaccine Slot, जाणून घ्या पद्धत 

Next

कोरोनावर यावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण वेगाने सुरु आहे. लसीच्या दोन्ही मात्र घेणाऱ्या लोकांना देशात आणि देशाबाहेर फिरण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी सहज मिळते. जर तुम्हाला लस घ्यायची असेल तर तुम्ही CoWin वेबसाईटवरून तुमचा स्लॉट बुक करू शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरून वॅक्सीन स्लॉट कसा बुक करायचा हे सांगणार आहोत.  

यासाठी तुम्हाला आरोग्य मंत्रालयाच्या MyGov Corona Helpdesk नावाच्या एका WhatsApp Chatbot ची मदत घ्यावी लागले. या WhatsApp चॅटबॉटवरून तुम्ही लस प्रमाणपत्रची सॉफ्ट कॉपी देखील डाउनलोड करू शकता. आता MyGov Corona Helpdesk चॅटबॉटवरून लसीची पहिली आणि दुसरी मात्र घेण्यासाठी स्लॉट बुक करता येईल.  

WhatsApp चॅटबॉटच्या मदतीने वॅक्सीन स्लॉट बुक करण्यासाठी  

MyGov कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही तुमच्या पिनकोडच्या आधारावर लसीकरण स्लॉट बुक करू शकता. यात तुम्हाला तुमच्या सोयीची वेळ आणि तारीख निवडता येते. परंतु तुमच्याकडे CoWIN चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. त्यामुळे WhatsApp chatbot चा वापर करण्याआधी CoWIN वर रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:  

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये +919013151515 नंबर सेव करा. 
  • त्यानंतर WhatsApp वर जात आणि MyGov कोरोना हेल्पडेस्क बॉट शोधा. 
  • WhatsApp चॅटबॉटला ‘Book Slot’ असा मेसेज टाईप करून पाठवा. 
  • आता तुमच्या फोनवर एक 6 डिजिटचा OTP येईल. हा ओटीपी चॅटबॉटवर सबमिट करा. 
  • आता बॉट तुम्हाला तुमच्या नंबरने CoWIN वर नोंदणी केलेल्या लोकांची नावे दाखवेल. ज्या व्यक्तीसाठी लस बुक करायची आहे त्याची निवड करा.  
  • MyGov कोरोना हेल्पडेस्क तुम्हाला लसीचा प्रकार आणि पिनकोड विचारेल आणि त्याआधारावर तुमच्या आजूबाजूच्या केंद्रांची माहिती देईल. तुमच्या सोयीनुसार निवड करा आणि स्लॉट बुक करा.  

Web Title: How to book covid vaccine slot using whatsapp step by step process 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.