मोबाईल चार्जर ओरिजनल आहे की डुप्लिकेट कसे ओळखाल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:29 PM2018-09-05T15:29:19+5:302018-09-05T15:36:53+5:30

एका सर्वेनुसार, ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळणारे जास्तीत जास्त स्मार्टफोन चार्जर हे डुप्लिकेट असतात.

How can a mobile charger is original or duplicate? | मोबाईल चार्जर ओरिजनल आहे की डुप्लिकेट कसे ओळखाल? 

मोबाईल चार्जर ओरिजनल आहे की डुप्लिकेट कसे ओळखाल? 

Next

एका सर्वेनुसार, ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळणारे जास्तीत जास्त स्मार्टफोन चार्जर हे डुप्लिकेट असतात. अशात त्यांचं जास्त गरम होणे, ब्लास्ट होणे, फोन खराब होणे, वेळेत चार्जिंग न होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. पण चार्जर डुप्लिकेट आहे की, ओरिजनल हे कसं ओळखायचं हेही आव्हानच आहे. पण आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्यांच्या डुप्लिकेट आणि ओरिजनलमधील फरक कसा ओळखायचा याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

सॅमसंग

सॅमसंगच्या ओरिजनल आणि डुप्लिकेट चार्जरमधील फरक फारच छोटा असतो. जसे की, चार्जरच्या प्रिंटेड मॅटरमध्ये 'A+' आणि 'मेड इन चाइना' लिहिले असेत तर ते चार्जर डुप्लिकेट असतं. सोबतच ओरिजनल चार्जरच्या पिनचा बेस(पांढरा भाग) खाली जाड आणि वर बारीक असतो. डुप्लिकेट चार्जरमध्ये हा भाग एकसमान असतो. 

आयफोन चार्जर

सॅमसंगप्रमाणेच आयफोनच्या चार्जरची ओळख पटवणे सोपे नाहीये. ओरिजनल चार्जरच्या अडॅप्टरवर प्रिंटेड मॅटर सेमी ट्रान्सपरंट असतं, तर डुप्लिकेटवर हे मॅटर डार्क काळ्या शाईने प्रिंट केलेलं असतं. ओरिजनल चार्जरवर डिझाइन बाय कॅलिफोर्निया लिहिलेलं असतं तर डुप्लिकेटवर मेड इन चायना असं लिहिलेलं असतं. 

एमआय

चीनची कंपनी mi चेही बाजारात डुप्लिकेट चार्जर विकले जात आहेत. चार्जरची केबल जर १२० सेंटीमीटरपेक्षा कमी आहे, अडॅप्टरचे कोपरे शार्प नाहीयेत आणि याची साइजही सामान्य चार्जरपेक्षा मोठी असेल तर ते डुप्लिकेट चार्जर आहे. 

वन प्लस

वन प्लस आपल्या डॅश चार्जरसाठी प्रसिद्ध आहे जे काही मिनिटांमध्ये मोबाईल फुल चार्ज करुन देतं. पण मोबाईल मॉडलच्या हिशोबाने अडॅप्टर वेगळा असू शकतो. वन प्लसचं ओरिजनल चार्जर ओळखायची पद्धत म्हणजे जेव्हाही तुम्ही प्लग ऑन कराल तेव्हा स्क्रीनवर डॅश चार्जिंग लिहीलेलं दिसेल. तेच जर चार्जर डुप्लिकेट असेल तर केवळ चार्जिंग लिहिलेलं दिसेल.

हुवेई

हुवेईचं चार्जर ओळखायचं असेल तर अडॅप्टरवर असलेला बारकोड स्कॅन करा. बारकोडवर जी माहिती आहे ती बारकोडसोबत मिळती-जुळती नसेल तर तो चार्जर डुप्लिकेट आहे. 

गुगल पिक्सल

दुसऱ्या फोन्सप्रमाणे गुगलनेही आपल्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये लवकर चार्जिंगची सुविधा दिली आहे. पण जर चार्जर डुप्लिकेट असेल तर लवकर चार्जिंग विसरुन जा. चार्जरच्या पिनवरुन तुम्ही डुप्लिकेट आणि ओरिजनल चार्जरची ओळख पटवू शकता. डुप्लिकेट चार्जरची पिन लांब असेल आणि ओऱिजनलची छोटी असेल. 
 

Web Title: How can a mobile charger is original or duplicate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.